...

नोंदणी व मुद्रांक विभागातील सह दुय्यम निबंधकाचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल 

 

पुणे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील (department of registration and stamps maharashtra) भ्रष्ट्राचार अनेकवेळा समोर आला आहे. आता पुणे शहरातील हवेली क्र.9 कार्यालयाचा सह दुय्यम निबंधक काम करुन देण्यासाठी आलेल्या नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल (The video went viral on social media) झाला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याची अन्य प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. (Video of sub registrar in registration and stamp department taking money viral) 

 

 

 

मालमत्ता खरेदी विक्रीची नोंद करण्यासाठी नागरीक नोंदणी व मुद्रांक विभागाच्या नोंदणी कार्यालयात येत असतात. मात्र, येथे एंजट मार्फत येणाऱ्यांचीच कामे वेळेत होतात. मात्र, जो नागरीक पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतो, त्याचे काम वेळेत केले जात नाही. त्याला तारीख पे तारीख मिळत असते. गुठ्ठेवार आणि बेकायदा दस्तांची नोंदणी केल्या प्रकरणी 44 जणांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, त्यातूनही अधिकाऱ्य़ांनी धडा घेतलेला नाही. आजही पैसे दिल्याशिवाय काम केली जात नाहीत.

 

 

 

पुणे शहरातील पुणे शहरातील हवेली क्र.9 कार्यालयात कामासाठी एक महिला आणि पुरुष सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्या समोर बसलेले आहेत. त्या दोघांनीही चव्हाण यांना पैसे दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासंदर्भात युवक काँग्रेस राज्य सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील (Youth Congress State General Secretary Rohan Suravse-Patil) यांनी नोंदणी व मुद्रांक विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आता तरी हवेली क्र 9 च्या सब रजिस्ट्रार वर कारवाई, अशी मागणी केली आहे. कराण यापुर्वी चव्हाण यांच्या कारनाम्यांची तक्रार करण्यात आली. मात्र, त्याचा उपयोग झालेला नाही, असे सुरवसे यांनी सांगितले.

 

 

 

 

Local ad 1