Ahmednagar district hospital । अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगित दहा कोरोना बाधितांचा मृत्यू

Ahmednagar district hospital । अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू कोरोना कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. (Ten corona victims die in Ahmednagar district hospital fire)

 

आयसीयू कक्षामध्ये 25 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू होते. या कक्षाला सकाळी आग लागली आणि या आगीमध्ये हे सर्व रुग्ण गंभीर भाजले. त्यामध्ये सात जण सात जण अत्यंत गंभीर असून राहिलेल्या 20 जणांना तातडीने इतर कक्षांमध्ये हलवण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात आली. (Ten corona victims die in Ahmednagar district hospital fire)

जिल्हा रुग्णालयाच्या आय़सीयूमध्ये भीषण आग लागून अनेकजण होरपळले आहेत. यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आज सकाळी ही आग लागली. यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिली. (Ten corona victims die in Ahmednagar district hospital fire)

हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार हे उद्या दिल्लीला जाणार असल्याने कोरोना चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात आले होते. ते बाहेर उभे असतानाच कक्षाला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोकरणा हेही त्यांच्या दालनामध्ये होते. पोपटराव पवार यांना ही आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व यंत्रणांना तातडीने फोन केले

 

समीर वानखेडेना धक्का : आर्यन खानसह सहा प्रकरणाचा तपास काढून घेतला

अग्निशमन दल, जिल्हाधिकारी कार्यालयाची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा महापालिकेची यंत्रणा यांनी तातडीने घटनास्थळी धाव धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आयसीयू रुग्ण भाजलेल्या अवस्थेत असताना त्यांना तातडीने इतर कक्षात हलवण्यात आले आणि तातडीने त्यांना ऑक्सिजन व्हेंटिलेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. (Ten corona victims die in Ahmednagar district hospital fire)

मृतांची नावे

रामकिसन विठ्ठल हरपुडे( वय ७०), सिताराम दगडू जाधव (८३), सत्यभामा शिवाजी घोडचौरे( ६५)य, कडूबाळ गंगाधर खाटीक (६५), शिवाजी सदाशिव पवार (८२) , दीपक विश्वनाथ जेडगुले (५७), कोंडाबाई मधुकर कदम (७०), आसराबाई नांगरे (५८ ), छबाबी अहमद सय्यद (६५) व एक अनोळखी असा चार महिला व सहा पुरुषांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

Local ad 1