पुणे : राज्यातील पदविकाधारक लघु पशुचिकित्सक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच त्यांच्या व्यावसायिक हक्कांच्या पूर्ततेसाठी संघटनेने तयार केलेले प्रारूप विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात सादर करण्यासाठी येत्या बुधवारी (दिनांक 28 डिसेंबर) रोजी विधानसभेवर मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती व्हेटर्नरी ॲनिमल हजबंडरी अँड डेअरी मॅनेजमेंट सर्विसेस ऑर्गनायझेशनचे सचिव डॉ. नारायण जोशी यांनी येथे दिली. (Veterinarian Services Federation’s March on Legislative Assembly in Nagpur on Wednesday)
डॉ. नारायण जोशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात दुधाचा पूर्व या योजनेच्या यशामध्ये पदविकाधारक व प्रमाणपत्र धारक लघु पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा मोठा सहभाग आहे राज यांनी मान्य केले आहे. मात्र, या खासगी पशुवैद्यकांना मदत करण्याऐवजी भारतीय पशुवैद्यक कायद्याचा आधार घेऊन अत्यंत अडचणीत आणण्याचे काम सरकारने आतापर्यंत केले आहे. (Veterinarian Services Federation’s March on Legislative Assembly in Nagpur on Wednesday)
सरकारने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमध्ये सुयोग्य बदल करून भारतीय पशुवैद्यकीय सेवा महासंघाने सादर केलेल्या अधिसूचनेच्या प्रारूप आराखड्याप्रमाणे योग्य बदल व्हावा, पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय संस्थांना शैक्षणिक दर्जा प्रदान करण्यात यावा, राज्यातील पदविकाधारक आणि प्रमाणपत्र धारक लघुवैद्यकीय लघु पशुवैद्यकीय व्यावसायिकांना कायद्यानुसार ओळखपत्र देण्यात यावे, राज्यातील पदविका प्रमाणपत्र धारकांना आर्थिक लाभ देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचा विस्तार कक्षाच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा आदी प्रमुख मागण्यांच्या समर्थनासाठी आम्ही नागपूर येथे येत्या बुधवारी 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती डॉ. नारायण जोशी यांनी येथे दिली. यावेळी संघटनेचे सदस्य आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Veterinarian Services Federation’s March on Legislative Assembly in Nagpur on Wednesday)