खुषखबर..! पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील वहाने टोलमुक्त
पुणे : पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर येथील टोलनाक्यावर भोर, वेल्हा, मुळशी, हवेली आणि पुरंदर (Bhor, Velha, Mulshi, Haveli, Purandar) या पाच तालुक्यातील नागरिकांना टोलमाफी देण्याचा निर्णय टोल वसूल (Toll collection) करणाऱ्या कंपनीने घेतला आहे. ही गेल्या अनेक वर्षापासून स्थानिकांची मागणी होती, अशी माहिती खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर (Dyaneshwar Darwatkar convener of Khed Sivapur toll booth removal action committee) यांनी दिली. (Vehicles in five talukas of Pune district are free of toll)
खेड शिवापूर टोल नाका (Village Shivapur Toll Gate) हटाव कृती समितीने टोलनाका स्थलांतरित करण्यासाठी दि.2 एप्रिल 2023 रोजी पुकारलेल्या जनआंदोलनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आमदार संग्राम थोपटे, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम (Collector Dr. Rajesh Deshmukh, MLA Sangram Thopte, Resident Deputy Collector Himmat Kharade, Sanjay Kadam of National Highway Authority), टोल प्रशासनाचे अधिकारी अमित भाटिया (Toll administration officer Amit Bhatia) आदी उपस्थित होते. (Vehicles in five talukas of Pune district are free of toll)
बैठकीमध्ये टोलनाक्यामुळे भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर आणि हवेली या तालुक्यांमधील नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कृतीसमितीने आक्रमकपणे भूमिका मांडली. या बैठकीत आमदार थोपटे म्हणाले, दि.16 फेब्रुवारी 2020 रोजी केलेल्या आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाने टोलनाका स्थलांतरीत होत नाही तो पर्यंत टोल वसुली करणार नाही, असे पत्र कृती समितीला दिले होते. मात्र टोलवसुली पुन्हा सुरु करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून होत असलेली टोल वसुली तात्काळ थांबवावी आणि टोलनाका स्थलांतराचा निर्णय लवकर घ्यावा, अशी सूचना केली.
समितीचे निमंत्रक दारवटकर म्हणाले, हा टोल नाका पीएमआरडीएच्या हद्दीत येत असून, वाढते नागरीकीकरण व औद्योकीकरण या भागात झाले आहे. हा टोल नाका या ठिकाणावरून स्थलांतरित होण्यासाठी सर्व पक्षीय आंदोलने 2011 पासून येथे झालेली आहेत. म्हणून या टोलनाक्याचे स्थलांतर होणे आवश्यक आहे. दरम्यान सोमवारी झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने येत्या दोन एप्रिल रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या बैठकीत पाच तालुक्यातील नागरिकांना अधिकृत ओळखपत्र दाखवून टोलनाक्यावरून टोल मधून सूट मिळणार आहे. (Vehicles in five talukas of Pune district are free of toll)
टोलनाका स्थलांतराचा प्रस्ताव सादर होणार
टोलनाक्याचे स्थलांतरीत करण्यासंदर्भात टोल प्रशासनाचे अधिकारी भाटिया यांनी टोलनाका स्थलांतर करण्यास सहमती दर्शवली असून याबाबतचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाणे घ्यावा, अशी भूमिका मांडली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी टोलनाका स्थलांतर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.