कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट हद्दीत प्रवेश करण्यसाठी वसूल केले जाणारे वाहन टॅक्स वसुली बंद करण्यात आली. विशेष म्हणजे देशातील पुणे वगळून सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रवेश शुल्क बंद करण्याचे गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे विविध संघटनांची मागणी मान्य झाली आहे. (Vehicle entry fee canceled in Pune Cantonment Board)
देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांना ‘वाहन प्रवेश शुल्क’ आकारणी बंद करा अशा सूचना केंद्रीय संरक्षण विभागाने केल्या होत्या. त्यानुसार खडकी आणि देहू कॅन्टोन्मेंट बोर्डाने तात्काळ त्याची अंमलबजावणी केली. मात्र, पुणे कँटोन्मेंट बोर्ड ‘वाहन प्रवेश करा’ची आकारणी करते, त्यामुळे हे पत्र पुणे कँटोन्मेंट बोर्डाला लागू नाही, असे त्यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. (Vehicle entry fee canceled in Pune Cantonment Board)
कँटोन्मेंट बोर्डाकडून बॅरिकेड, नाके, संकलन केंद्रे उभारून वाहन प्रवेश शुल्क घेतले जाते ही बाब केंद्र सरकारच्या मालाची ने-आण व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या पुढाकाराशी आणि ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठीच्या प्रयत्नांशी अनुसरून नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, बोर्डाने सुरु ठेवण्याची भूमिका घेतली होती. जोपर्यंत आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश येत नाही, तोपर्यंत शुलक् वसुली सुर राहिव, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. (Vehicle entry fee canceled in Pune Cantonment Board)