वज्रमुठ मेळाव : भारत मातेच्या रक्षणासाठीच वज्रमुठ : उद्धव ठाकरे

Chhatrapati Sambhajinagar संभाजीनगर : दोन वेळा आपले सरकार आले. दोन्ही वेळेला केद्रात आणि राज्यात युतीचे सरकार होते. पण औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर झाले नव्हते. त्यामुळे मी मविआच्या सहकाऱ्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ते करुन दाखवले. यावरून त्यांची वृत्ती समजून आली. निवडणुका आली की जातीय तेढ निर्माण करायची. ज्यावेळेला जातीय तेढ निर्माण होईल तेव्हा समजा निवडणुका जवळ आल्या आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी टिका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे. या व्यासपीठावरुन मी अनेकदा आपल्याशी संवाद साधला आहे. गेल्यावर्षी ८ जूनला होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. मी ज्या -ज्यावेळेला या मैदानावर येतो तेव्हा गर्दीचा दुष्काळ बघितलेला नाही. आज अभिमान, समाधान आणि आनंदाने आलेलो आहे. कारण हेच ते मैदान, हेच ते शहर, जिथे १९८८ साली आपण महापालिका शिवसेनेच्या हाती दिल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी या शहराचे नाव संभाजीनगर करतो असे म्हटले होते. त्यानंतर काय घडले ते आपण पाहिले. आपण २५ वर्ष भ्रमात होतो.

 

 

  • गौरव यात्रा जरुर काढा. हिंदू जनआक्रोश नवीन सुरु झाल आहे. मुंबईत मोर्चा निघाला होता. कुठून काढला माहिती नाही. पण शिवसेना भवन पर्यंत आला होता. याचा अर्थ एकच जगातला सर्वात शक्तिमान हिंदू नेता या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना आक्रोश करावा लागतोय मग नेत्याची काय शक्ती आहे? मविआच्या सरकारमध्ये कोणत्याही समूदायाला आक्रोश करण्याची वेळ आली नव्हती. गेल्या रविवारी मालेगावात असंख्य हिंदू बांधव सभेसाठी आले होते. (Vajramuth for protecting Mother India : Uddhav Thackeray)
  • माझ्यावरती आरोप करत आहेत. मी हिंदुत्व सोडलं. या छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात विचारतो की मी खरंच हिंदुत्व सोडलं तर एक उत्तर द्या. मी घरात जावून बसेन पुन्हा तोंड दाखवू नका. जातीय रंग देत असाल तर हा घटनेचा अवमान आहे. मी म्हणजे आम्ही महाविकास आघाडी. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडतो. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तेव्हा मेहबूबा मुफ्ती बरोबर काश्मीरमध्ये सरकार बनवलं तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही का? (Vajramuth for protecting Mother India: Uddhav Thackeray)
  • तुमची मस्ती असेल तर ती गाढण्यासाठी वज्रमूठ उभारली आहे. लाखो युवक सुशिक्षित आहेत. अनेकांची परिस्थिती बेताची आहे. कर्ज काढून पदवी मिळवेलेली आहे. अलीकडे डॉक्टरेट ही विकत घेता येते. काहीजण पाणी भरलेले इंजेक्शन घेऊन फिरतो. अनेकजण पदव्या दाखवतात पण किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांना पदवी दाखवा म्हणून मागितलं तर २५ हजारांचा दंड बसतो. आज या व्यासपीठावर जयंत पाटील आणि मी आहे. आम्ही दोघे एकाच शाळेचे आहोत. बालमोहन विद्यामंदिर चे आहोत. त्या शाळेला मंत्री झाल्यानंतर अभिमान वाटला होता. असा अभिमान पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्यांना का वाटू नये? पदवी मागितली तर दाखवणार नाही. मग या पदवीचा उपयोग दंड भरण्यासाठी घेता का काय? (Vajramuth for protecting Mother India: Uddhav Thackeray)

मला एक सांगा, मविआचं सरकार पसंत होतं की नव्हतं? छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करायचा? हो आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो होतो. पण सत्ता गेल्यानंतरही साथ आहोत. असं काही नाही की, मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण मला आवरावी लागते. मला अमित शाह यांना विचारायचं आहे, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चाटतो. मग तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटताय? चांगली चाललेली सरकार फोडायचं आणि पाडायचं. नितीश कुमार आणि लालू यादव यांचं सरकार पाडून तुम्ही काय चाटत होता?

  • मोदी म्हणतात मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा हे. मग आमची प्रतिमा नाही का? तुमचा कुणी ही सोम्या गोम्या आमच्यावर काहीही म्हणायचं. मोदींना म्हटलं की ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भाजप आहे. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिलं जातंय. विरोधी पक्षामध्ये दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात. सर्व विरोधी पक्षाचे भ्रष्ट नेते भाजपात. तुमच्या पक्षाचं नाव भ्रष्ट जनता पार्टी ठेवा.
  • अजित पावारांनी जो उल्लेख केला की, मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकेकाळी भाजपच्या मंचावर साधुसंत असायचे. पण आता संधीसाधू होते. पण तो जमाना अटलजींचा होता. या देशातील लोकशाही संपवून टाकायची, एकही विरोधी पक्ष या देशात शिल्लक ठेवायचं नाही. राहिला तर जेलमध्ये टाकायचं. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेला चाललीय. सावरकरांची यात्रा काढता तर काढा. पण त्यांचं अखंड हिदुस्तानचे स्वप्न पूर्ण कराल का?
  • अमित शाह म्हणाले शिवसेनेला जमीन दाखवायचं आहे. जमीन दाखवायचे असेल तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन घेऊन दाखवा. सरदार वल्लभाई पटेल यांचा मोठा पुतळा बांधला आहे. वल्लभाई नसते तर मराठवाडा मुक्त झाला असता की नाही? हा प्रश्न आहे. तीच हिंमत तुम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये का दाखवत नाही? घुसवा फौजा. पण निवडणुका आल्यानंतर काहीतरी करणार आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या.
  • लोकशाही कशी असली पाहिजे तर इस्त्राईलसारखी असली पाहिजे. जो घातक प्रकार आख्य़ा देशात भाजप करु इच्छित आहे, न्यायव्यवस्थेत आपली माणसं घेऊ पाहत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचं ऐकलंच पाहिजे, असे प्रयत्न सुरु आहेत. ज्यादिवशी न्यायालयावर यांच्या ताब्यात जाईल त्यादिवशी लोकशाही संपेल. इस्त्राईलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र. नेत्यान्याहू यांनी तसा प्रयत्न केला तेव्हा देशाने संप पुकारला. मंत्री, पोलीस प्रमुख संपावर गेले. राष्ट्रपतींनी सुद्धा पंतप्रधानांना झापलं. लोकांनी एवढा प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर पंतप्रधानांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं.
  • तुम्हाला निवडून दिलं म्हणून वाटेल ते करु नका. पंतप्रधानांवर वचक देण्याचं काम करु नका. सर्वोच्च न्यायालय या सरकारला बोललं तसं आपण नाही. आपण घटनेचं रक्षण करणार. बघुया कोण येतंय की घटना पायदडी तुटवणार नाही, ही जिद्द आमच्यामध्ये आहे. जय जवान, जय किसान तसं जय कामगार. तुम्ही मेहनत करता. तुम्ही म्हणाल तर आम्ही राज्यकर्ते. राज्यकर्त्याचे काम हे देशाला दिशा देण्याचे. दिशा चुकली तर सत्तेवरुन तुम्ही पायउतार करू शकता.
  • शेतकरी विम्याचे पैसे घ्यायला जातो तेव्हा दहा रुपयाचे चेक दिले जातात. विमा कंपनी कुणाची? तर अदानीची. आपलं सरकार होतं तेव्हा आपण का नाही हे केलं? असं विचारता. पण आम्ही फसवाफसवीचे धंदे केले नाही. आम्ही दोन लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ केलं होतं. हे सरकार गेलं नसतं तर नियमित कर्जफेड भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार राशी देणार होतो.
  • आता कोरोना वाढतोय. मी जे काम घरातून केलं ते तुम्ही दिल्ली, गुवाहाटी जावून होणार नाही. परवा मी मालेगावात गेलो होतो. गेल्यावर्षी एका कांद्याची खरेदी झाली. एका कांद्याला ५० खोके, मगा कांद्याच्या शेतकऱ्याला किती पैसे मिळायला पाहिजे?
  • आज सुद्धा माझ्या हातात काही नाही. चांगले दिवस असतात त्यावेळेला कोण असतं? ज्यावेळेला भाजप अस्पृश्य होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी साथ दिली होती. भाजपसोबत आहे कोण? शिवसेना, अकाली दल सोबत नाही. ज्यावेळेला गरज होती तेव्हा वापरुन घेतलं आणि आता लाथ पारत आहेत. त्यांना खाली खेचायचं आहे. आज त्यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरलं. एवढंच नाही तर वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अरे स्वत:च्या वडिलांना किती त्रास होत असेल, यांना बापसुद्धा इतरांचा लागतो. मी माझ्या वडिलांचं नाव सोडणार नाही. मी भाजपला आव्हान देतो हिंमत असेल तर मोदींनी यावं आणि त्यांच्या नावाने मतं मागावी.
  • आज मित्रपक्ष कठीण काळात सोबत राहीले हे विसरु नका. तुम्ही माझं काय चोरणार. मला माझ्या जगदंबेचे आशीर्वाद आहेत. तुमच्या सभेला तुम्ही माणसं भाड्याने लागतात. सभेतही वाचू का विचारतात. तुम्ही दुसऱ्याचे विचार मांडता. तुमच्यासमोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल. पण समोर बसलेली जनता तुम्हाला वाचवू शकणार नाही. जनतेशी खेळ करु नका.
  • आमचं सरकर खेळणारं नाही तर देणरं आहे म्हणे. काय दिलं? तरुणांना रोजगार दिलं. शेतकऱ्यांना हमीभाव दिला? राजेश टोपे यांनी आरोग्य खातं ज्या पद्धतीने सांभाळलं होतं त्याबद्दल धन्यवाद देतो. राजेश टोपे यांना औषधांचं नाव तोंडपाठ होतं. पण आताचे आरोग्य मंत्रा आहेत ते… जाऊद्या त्यांच्यावर कोणताही विषय बोलण्यासारखं नाही.

आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा सीबीआय, ईडी घरात घुसवता. अनिल देशमुख यांच्या नातेची चौकशी करता, तेजस्वीच्या पत्नीची बेशुद्ध होईपर्यंत चौकशी करत होता हे तुमचं निर्घृण हिंदुत्व. कशाला हिंदुत्वाचं नाव घेता? ज्या छत्रपतींना कल्याणच्या सुभेदारांच्या सूनेला सन्मानाने परत पाठवलं होतं हे आमचं हिंदुत्व होतं. एक नेता आमच्या सुषमा अंधारेंना खालच्या पातळीवर बोलतो हे तुमचं हिंदुत्व नव्हतं. हे ज्यावेळेला शिवसेनेत होते तेव्हा त्यांचं तसं बोलण्याची हिंमत नव्हती. हाकलून दिलं असतं. महिलेला शिवीगाळ करणं ही गटारगंगा मी खपवून घेणार नाही. तुम्ही भगवा हाती घेऊ नका, तो तुम्हाला शोभत नाही.

  • नुसती सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता. आम्ही तुमच्यासोबत होतो. मी शिवेसनाप्रमुखांना काय वचन दिलं होतं की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. मी मुख्यमंत्री होईन, असं वचन दिलं नव्हतं. हे मी अमित शाह यांना स्पष्ट सांगितलं होतं. आजसुद्धा तुम्ही शिवसेना फोडली. पण तरीही हृदयावर दगड ठेवून बसला आहात ना? मिंदेंंचे ओझे डोक्यावर घेऊन निवडणूक लढवणार आहात का? हा फसवणुकीचा खेळ कशासाठी चालवला आहे? शिवसेना संपवण्यासाठी? पण ते तुम्हाला पेलवणार नाही.
  • ही आमची सभा. या सभेला वज्रमूठ असंच नाव दिलेलं नाही. तुम्ही आमचे हात घ्यायला निघालात. बाळासाहेबांनी शिवसैनिकाला मोठं करण्याची वृत्ती दिली. मोठी करणारी माणसं आज माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे. ही वज्रमूठ भारत मातेचे रक्षण करण्यासाठी आहे. ज्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो, सोसलो, अगदी सावरकरांचे भक्त आले असते, ज्या सावरकरांनी 14 वर्ष भोगलं तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी भोगलं. तेच स्वातंत्र्य धोक्यात आहे हे भाजपमधल्या सावरकर भक्तांना मान्य आहे का? आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे नाहीतर आपणच आपल्या देशात गुलाम होऊ.
Local ad 1