...

(vaccine second dose) नांदेड जिल्ह्यात दुसरा डोस 92 केंद्रांवर उपलब्ध

नांदेड  :  जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना सोमवारी कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील एकुण 92 केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. (Nanded District Vaccine Second Dose)

सोमवारी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. (Nanded District Vaccine Second Dose)

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत. मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या 8 केंद्रावर 45वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा लस उपलब्ध आहे. मनपा क्षेत्रात स्त्री रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन तर शहरी क्षेत्रात मोडणारे सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा एकुण 16 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन ही लस आणि ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या एकुण 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड ही लस उपलब्ध आहे.

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांना नमूद केल्या प्रमाणे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात 16 मे पर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख 1 हजार 800 डोस असे एकुण 4 लाख 36 हजार 730 डोस मिळाले आहेत. जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत एकुण 3 लाख 96 हजार 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. (Nanded District Vaccine Second Dose)

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे या कालावधीत म्हणजेच 84 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध असलेला कोविड-19 लसीचासाठा हा केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यासाठी व दुसऱ्या डोसचे लाभार्थी नसल्यास प्रथम डोससाठी वापरण्यात येणार आहे. उपलब्ध कोव्हॅक्सिनची लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे.

वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून अनावश्यक गर्दी करु नये. तसेच कोविड-19 लसीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले आहे. (Nanded District Vaccine Second Dose)

Local ad 1