नांदेड जिल्ह्यात गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी

नांदेड Dolby System News : गणेशोत्सव साजरा करताना धार्मिक विधी, समाजिक कार्याबरोबरच डॉल्बी सिस्टीमचा (Dolby System) वापर केला जातो. विषेश म्हणजे हा वापर विसर्जन मिरवणुकीत होतो. परंतु यंदा डॉल्बी सिस्टीम वापरण्यावर जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी बंदीचा आदेश जारी केला आहे.  (Use of Dolby system banned during Ganesh festival in Nanded district)

 

 

जिल्ह्यात गणेश उत्सव काळात डॉल्बी सिस्टीम वापरास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर (District Magistrate Dr. Vipin Itankar) यांनी प्रतिबंध केले आहे. हा आदेश 10 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पासून 19 सप्टेंबर रोजी मध्यरात्री पर्यंत लागू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

गणेश उत्सव काळात जिल्ह्यातील डॉल्बी चालक-मालकाच्या डॉल्बी सिस्टीम रोखून ठेवण्यासाठी कब्जा असलेल्या ठिकाणच्या जागेवरच त्या सिलबंद करुन प्रतिबंध कराव्यात. डॉल्बी सिस्टीम चालक-मालकांनी (Dolby system driver-owners) डॉल्बी सिस्टीम वापरात उपभोगात आणु नये, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

 

 

Local ad 1