वीज पडून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी ‘दामिनी’ अ‍ॅप वापरा

पुणे : मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले “दामिनी ” अ‍ॅप वापरण्याचे प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. (Use Damini aap to prevent damage due to lightning)

 

पुण्यात ATS ने एका दशहतवाद्याला केली अटक

 

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना अॅपचा वापर करावा. (Use Damini aap to prevent damage due to lightning)

 

मंकीपॉक्स म्हणजे काय?, कसे हातो?, त्यावर उपचार आहेत का ? जाणून घ्या…

 

येथून करा डाऊनलोड 

“दामिनी” अॅप गुगल प्लेस्टोअरवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. अॅपमध्ये आपल्या सभोवतालीच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थालंतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

 

महापालिकेची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर, इच्छुकांची धाकधूक वाढली

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी.
हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे.

Local ad 1