UPSC कडून दिव्यांग कोट्याद्वारे भरती झालेल्यांची माहिती देण्यास नकार –  अक्षय जैन

पुणे : प्रशिक्षणार्थी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी (आयएएस) पूजा खेडकर (ias puja khedkar) यांच्यावर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) त्यांच्यावर कारवाई केली. मात्र याच आयोगास दिव्यांग कोट्यातून किती जागा भरल्या आहेत, किती जणांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले आहे, याबाबतची माहिती नाही, संबंधित माहितीबाबत लपवाछपवी केली जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन (Harashtra Pradesh Youth Congress General Secretary Akshay Jain) यांनी पत्रकार परिषदेत केला. (UPSC refusal to provide details of recruits through Divyang Quota – Akshay Jain)

 

‘आत्म’हत्येसाठी तरुणी सिंहगडावर आली ; पहारेकऱ्याला आला संशय अन् चक्र गतीने फिरल्याने वाचले तरणीचे जीव

 

जैन म्हणाले, “बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करण्याचा प्रकार एकट्या खेडकर यांनीच नव्हे, तर अनेकांनी केलेला आहे. २०१६ ते २०२४ या वर्षांमध्ये आयोगाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या दिव्यांग उमेदवारांची त्यांच्या क्रमवारीसह नावे, संबंधित उमेदवारांनी दिलेल्या प्रमाणपत्रांच्या प्रती, या उमेदवारांना वाटप केलेले केडर, या स्वरुपाची माहिती आयोगाकडे मागविली होती. मात्र आयोगाने ही माहिती देण्याचे टाळले. त्यामुळे या प्रकारात आयोगाकडुन लपवाछवपवी केली जात आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाने घेतले रेकाॅर्ड ब्रेक निर्णय ; कोणते आहेत निर्णय जाणून घ्या  (भाग-२)

आयोगाकडे अशी यादी स्वतंत्रपणे ठेवली जात नाही आणि संबंधित माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगितले. या विभागानेही माहिती देण्यास नकार दिला. दोन्ही संस्था देशातील सर्वोच्च नागरी सेवेतील पदावर नियुक्ती करणाऱ्या दोन संस्था असूनही त्यांच्याकडुन माहितीबाबत लपवाछपवी केली जात आहे.’
Local ad 1