UPSC exam schedule announced : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएससीच्या पुर्व आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यूपीएससीने पुढील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये होणाऱ्या विविध २४ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
Related Posts
विद्यार्थ्यांची पसंती असलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे २०२४ रोजी नियोजित आहे. तर मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२४ महिन्यात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे आता तयारीसाठी वर्षाचा कालावधी आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकामध्ये परीक्षेच्या तारखांसह जाहिरात कधी निघणार, अर्ज करण्याची अंतिम मुदत ही माहिती दिली आहे. (UPSC exam schedule announced)
नागरी सेवा परीक्षेसह वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, एनडीए, वैद्यकीय सेवा, सीडीएस, जिओ सायंटिस्ट, सीआयएसएफ आदी परीक्षांचा समावेश आहे. परीक्षांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हे वेळापत्रक यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.
दरम्यान, परिस्थितीनुसार परीक्षेच्या तारखा, अधिसूचना किंवा परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम मुदत तारखांमध्ये बदल होऊ शकतो, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (UPSC exam schedule announced)
महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक
- अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा : १८ फेब्रुवारी (रविवार)
- सीडीएस परीक्षा (१) : २१ एप्रिल (रविवार)
- नागरी सेवा (पूर्व) परीक्षा : २६ मे (रविवार)
- भारतीय वन सेवा (पूर्व) : २६ मे (रविवार)
- संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा : १४ जुलै (रविवार)
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (ACS) परीक्षा : ४ ऑगस्ट (रविवार)