...

Oxford Cup । ऑक्सफर्ड चषकाचे अनावरण ; ऑक्सफर्ड गोल्फ लीगची दिमाखदार सुरुवात

Oxford Cup । पुणे : ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट (Oxford Golf Resort) आयोजीत ऑक्सफर्ड गोल्फ लीगचे शनिवारी सकाळी ऑक्सफर्ड गोल्फ चषकाचे अनावरण करण्यात आले. ऑक्सफर्ड क्लबचे अनिल सेवलेकर आणि एस गोल्फिंगचे आदित्य मालपाणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व संघाचे प्रमुख खेळाडू उपस्थित होते. (Unveiling of the Oxford Cup ; The Oxford Golf League begins)

 

 

 

ऑक्सफर्ड गोल्फ प्रिमिअर लीगचा पहिला सामना अ गटातील द लीगशी क्लब विरुद्ध सुलतान ऑफ स्विंग असा झाला. त्यानंतर ईगल फोर्सेस विरुद्ध विंग्स वॉरिअर्स अशी रंगतदार लढत झाली. (Unveiling of the Oxford Cup; The Oxford Golf League begins)

 

 

दुसर्‍या भागामध्ये ब गटातील एके ज पुना लायन्स विरुद्ध रोरिंग टायगर्स नागपूर असा सामना दुपारच्या सत्रात तर त्यानंतर शुब्बान सनरायजर्स विरुद्ध ग्रीन ग्लॅडिएटर्स अशी अतिशय चुरशीची लढत झाली. आजच्या लढतीमध्ये इगल फोर्सेस 9, शुब्बान सनराइजेस 9, ऐस.जे.सुलतान ऑफ स्विंग 8.5, रोरिंग टायगर्स नागपूर 7, एके पुना लायन्स 5.5, द लीजन्सी क्लब 5.5, विंग वॉरियर्स 4.5, ग्रीन ग्लॅडिएटर्स 4 असे गुण आज झालेल्या पहिल्या फेरीत गुण मिळाले.

 

 

एका संघामध्ये पंधरा खेळाडू असून, आठ संघामध्ये एकूण 120 देशभरातील नामांकित खेळाडू सहभागी झाले. देशातील सर्वात नयनरम्य आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमध्ये ही स्पर्धा सुरु झाली. 1,2 व 8 आणि 9 जुलै रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.

Local ad 1