राज्यात अवकाळी पाऊस, मुख्यमंत्र्यांनी दिला मत्वाचा आदेश

 

मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी बुधवारी सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकार्‍यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. (Unseasonal rains in the state, the Chief Minister gave an order to vote)

शेतकर्‍यांना तातडीने दिलासा मिळाला पाहिजे. संकटग्रस्त शेतकर्‍यांच्या सरकार पाठीशी आहे. यादृष्टीने महसूल यंत्रणेने लगेच कामाला लागावे व पंचनामे करावेत असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.   (Unseasonal rains in the state, the Chief Minister gave an order to vote)

 

राज्यात कुठे झाला अवकाळी पाऊस

ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

अजूनही पावसाचा अंदाज

मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बर्‍याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना ही दिल्या आहेत.   (Unseasonal rains in the state, the Chief Minister gave an order to vote)
Local ad 1