(lockdown removed) नांदेडसह राज्यातील 18 जिल्हे संपूर्णपणे अनलाॅक

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने टप्प्या-टप्प्याने लाॅकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. ऑनलॉकसाठी कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन अनलाॅकचे टप्पे ठरविण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार असून, या जिल्ह्यातील निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आले आहेत. या जिल्ह्यात आता दुकाने, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु होईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी आज पत्रकार परिषद दिली. (unlock rules lockdown removed from 18 districts)

दुसऱ्या टप्प्यात जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबई लॉकडाऊन शिथील होणार नाही. तसेच मुंबई लोकलबातच्या निर्णयात तूर्तास कोणतेही बदल करण्यात आले नाहीत, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ठ केले. unlock rules lockdown removed from 18 districts

लॉकडाऊन शिथील करण्यासाठी 5 टप्पे ठरविण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्याच्या आत व्यापलेले असेल, तिथे सर्व गोष्टी सुरु होतील. रेस्टॉरंट, माल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील, खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील, थिएटर सुरू होतील, चित्रपट शुटिंगला परवानगी, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सूट दिली आहे. ई कॉमर्स सुरू राहिल, पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहे. बस 100 टक्के क्षमतेने  सुरु होतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल, अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागरपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे शिथिलता देण्यात आली.

अनलॉकचे असे आहेट टप्पे lockdown removed
पहिल्या टप्प्यात 18 जिल्हे
दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे
तिसरा 10 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 2 जिल्हे

Local ad 1