...

उद्धव ठाकरेंनी पुण्यात भाकरी फिरवली !

माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर दिली मोठी जबाबदारी

पुणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे सहा खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यासंदर्भात काही मोठे निर्णय घेतले आहे. पुणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंनी माजी नगरसेवक वसंत मोरे (Former corporator Vasant More) यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पुणे महानगरपालिका प्रमुख निवडणूक समन्वयक म्हणून वसंत मोरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतीच वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वसंत मोरे यांच्या खांद्यावर ही धुरा देण्यात आली आहे. पुणे मनपा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर वसंत मोरे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. जबाबदारी मिळताच वसंत मोरे यांनी ‘आता लावा ताकद’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Uddhav Thackeray gave a big responsibility to Vasant More in Pune!)

 

जीबीएसचा प्रादुर्भाव असलेल्या सहा गावांमध्ये 500 कोटी रुपये खर्चून उभारले जाणार जलशुद्धीकरण केंद्र 

 

उद्धव ठाकरे शाखांना भेट देणार

उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ठाकरे गटाच्या काही मोजक्या शाखांना भेट देणार आहेत. पुण्यात शिवसेनेच्या (उबाठा) २१ शाखा आहेत, त्यापैकी काही शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. या भेटीनंतर ते पुण्यातील सर्व शाखा प्रमुखांची एक संयुक्त बैठक घेणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील नवीन नियुक्त्या

प्रमुख निवडणूक समन्वयक : वसंत मोरे (पुणे शहर)
प्रभारी शहरप्रमुख : संजोग वाघेरे (पिंपरी चिंचवड, भोसरी )
जिल्हा प्रमुख : उल्हास शेवाळे (पुरंदर, दौंड)
जिल्हा संघटक : बाळासाहेब लक्ष्मण फाटक ( चिंचवड, मावळ )
शहर प्रमुख : परेश परशुराम बेडेकर (लोणावळा )
शहर प्रमुख : राजेंद्र गुलाबराव मोरे (देहूगाव)
शहर प्रमुख : संदीप बंडू बालगरे (देहूरोड )
Local ad 1