पुराच्या पाण्यात बैलगाडी उलटली; दोन महिलांचा मृत्यू तर तिघे बचावले

नांदेड loha news : गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस पिकांना जीवदान देणारा ठरला. तर दुसरीकडे दोन महिलांचा बळी घेणारा ठरला आहे. सोमवारी सकाळपासूनच नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. मात्र, लोहा (loha breaking news) तालुक्यातती सावरगाव (न), मस्की, बेरळी, देऊळगाव, हिप्परगा, चितळी, मुरंबी आदी माळाकोळी मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (Two women killed when a bullock cart was swept away in flood waters; The three survived) 

 

लोहा तालुक्यातील सावरगाव (न) येथील मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. ही घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यात परिसरातील नदी नाल्यांना पूर आले होते. दरम्यान, सावरगाव येथील शेतकरी अमोल दगडगावे हे आपल्या शेतात दैनंदिनी प्रमाणे सहकुटुंब गेले होते. पाऊस जोरदार बरसत असल्याने त्यांनी बैलगाडीतून घराकडे परण्याचा निर्णय घेतला. (Two women killed when a bullock cart was swept away in flood waters; The three survived)

 

घराकडे जात असताना ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यातील नदीला प्रचंड पूर आलेला होता. त्या पाण्यातून आपण जावू शकतो, असा आत्मविश्वास होता.परंतु पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बैलगाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्यात बसलेले पाच जणापैकी अमोल दगडगावे त्याचा भाऊ विवेक दगडगावे, शिवमाला अमोल दगडगावे, आई मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, चुलती पार्वतीबाई संभाजी दगडगावे हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, वय (52) व पार्वतीबाई संभाजी दगडगावे वय (45) ह्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तर अमोल दगडगावे, विवेक दगडगावे व शिवमाला दगडगावे हे नदीकाठी असलेल्या झाडाच्या फांदीला धरून जीव वाचविण्यात यशस्वी ठरले. (Two women killed when a bullock cart was swept away in flood waters; The three survived)

 

मयत मनकर्णाबाई दगडगावे या हुलायवाडी येथील पुलाजवळ आढळून आल्या तर दुसऱ्या पार्वतीबाई दगडगावे या पालम तालुक्यातील पेंडू येथील नदीत मृत अवस्थेत आढळून आल्या. मनकर्णाबाई व पार्वतीबाई या दोघी सख्या जावा होत्या. (Two women killed when a bullock cart was swept away in flood waters; The three survived)

 

घटनेची माहिती मिळताच कंधार उपविभागाचे उपविभागीय अधिकारी पी. एस. बोरगावकर, तहसीलदार राम बोरगावकर, माळाकोळी पोलीस ठाण्याचे सपोनी माणिकराव डोके, आदींनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

 

 

बांधकाम विभाग अजून किती बळी घेणार ?

पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत असताना सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून लक्ष देण्यात येत नसल्यामुळे नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. गत दोन वर्षांपूर्वी लोहा तालुक्यातील धानोरा (म) येथील कमी उंचीच्या पुलामुळे दोघांचा बळी गेला होता त्यानंतर कमी उंचीच्या पुलामुळे दुर्घटना घडून आणखी दोघांचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे. (Two women killed when a bullock cart was swept away in flood waters; The three survived)

Local ad 1