नांदेडच्या दोन पाणी वापर संस्थांचा पुण्यात सन्मान
पुणे : जलसंपदा विभागाच्यावतीने आयोजित महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन (Punyashlok Ahilya Devi Holkar Water Use Institution Management) व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार (Outstanding Engineer Award) वितरण पुण्यातील बालरंगमंदीर येथे करण्यात आले. त्यात नांदेड जिल्ह्यातील दोन संस्थांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Two water utility organizations of Nanded honored in Pune)
औरंगाबा विभागाचा सन 2014-15 या वर्षाचा प्रथम – जलस्वराज्य पाणी वापर संस्था, बारड, ता.मुदखेड, जि. नांदेड आणि द्वितीय – मुक्तागिरी पाणी वापर संस्था, देळुब, ता. अर्धापूर जि. नांदेड यांचा समावेश आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव विलास राजपूत, पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले उपस्थित होते. (Two water utility organizations of Nanded honored in Pune)
सिंचन व्यवस्थापनात पाणी वापर संस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून राज्यातील पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. जलसंपदा विभागाच्यावतीने दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी घोषणा जससंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली. (Two water utility organizations of Nanded honored in Pune)
जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, पाणी वापर संस्थाचे व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासोबतच पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी जलसंपदा विभागाने सुरू केलेली महात्मा फुले पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार योजना अत्यंत महत्वपूर्ण आहे. राज्यात पाणी वापर संस्थाच्या माध्यमातून पाण्याची सेवा देण्याचे कार्य सुरू आहे. गावशिवारातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणांसोबत पाणी वापर संस्थाचाही सहभाग आवश्यक आहे. पाणी वापर संस्थानी गावशिवारात पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काम करावे, असेही त्यांनी सांगितले.