Pune Porshe Car Accident : पुण्यात कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात दररोज नवनवी खुलासे होत आहेत. येरवडा पोलीस ठाण्यात असलेला अपघाताचा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे (Pune Police Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कल्याणी नगर पोर्शे अपघाताचा तपास केला जाणार आहे. येरवडा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (Assistant Commissioner of Police Aarti Bansode) यांच्याकडून तपास काढण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने आणि येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आत गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे (Crime Branch Assistant Commissioner of Police Sunil Tambe) या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. तर दुसरीकडे अघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोघांना निलंबित करण्यात आले आहे. (Two police officers suspended in Pune Porsche accident case)
आ. रविंद्र धंगेकर यांचा पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन , पोलिस आयुक्तांची बदली करा
आरोपी विशाल अग्रवालला न्यायालयीन कोठडी
पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला (Vishal Agarwal) शुकवारी (दि.24) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवालला पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. पण न्यायालयाकडून पुणे पोलिसांची मागणी फेटाळण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे विशाल अग्रवालला आता जामिन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह (Pune Drunk and Drive) प्रकरणी (Pune Porsche Car Accident) मोठी अपडेट समोर आली असून पुणे अपघात प्रकरणी पोलिस आयुक्तांनी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावे आहेत, तपासात दिरंगाई केल्याचा आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.