अमरनाथ यात्रेत पुण्यातील दोन यात्रेकरूंचा मृत्यू

  • पुणे : अमरनाथ यात्रेदरम्यान शुक्रवारी झालेल्या ढगफुटीत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात पुण्यातील एका महिलेचा समावेश आहे. तर अन्य एका पुरुषाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. (Two killed in Amarnath pilgrimage in Pune)

 

 

गजानन महाराज खेडेकर यांचेसोबत अमरनाथ येथे जाणारे यात्रेकरु

• यात्रेकरु व इतर व्यवस्थापक सर्व मिळुन संख्या 200 सदर यात्रेकरु गुरुकृपा ट्रव्हलमार्फत 4 खाजगी बसद्वारे अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. (Two killed in Amarnath pilgrimage in Pune)

 

 

• गजानन महाराज खेडेकर यांचेसोबत अमरनाथ जाणारे यात्रेकरु पैकी प्रदीप नाथा खराडे रा. पिंपरी हे खाली आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले होते. त्यांना पहाटे 4.00 वाजता हॉस्पीटलने मयत घोषीत केले. त्यांचे शव हे खाजगी रुग्णवाहीकेतून पुण्यास पाठविण्यात आले आहे. याबाबतची माहीती शुभम खेडेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांचेकडून मिळाली. बाकी इतर सर्व यात्रेकरु सुखरूप असून ते सध्या बलताल बेस कॅम्पमध्ये आहेत.

 

• सदर यात्रेकरू दि. 10/07/2022 रोजी परतीचा प्रवास सुरु करणार आहेत.

 

गजानन (अजय) महाराज सोनवणे यांचे सोबत अमरनाथ जाणारे यात्रेकरु माहीती माऊली यात्रा कंपनी, देहुफाटा, (आळंदी) यात्रेकरू व इतर व्यवस्थापक सर्व मिळुन संख्या 55 यापैकी 20 यात्रेकरु बालतान पाकींग तंबत सुरक्षित पोहचले आहेत. उर्वरीत 35 पैकी 34 यात्रेकरु वरती मिलेटरी कँप मध्ये सुरक्षित आहेत.

 

 

 

यात्रेकरु सुनिता महेश भोसले (रा. वडगाव बु.) या मयत झाल्याचे समजले आहे. त्यांचा मृतदेह जम्मु येथे हेलीकॉप्टरने घेऊन गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पती महेश भोसले व नणंद प्रेमा शिंदे आहेत. (Two killed in Amarnath pilgrimage in Pune)

Local ad 1