अभिनेत्री कंगणा राणावतचे ‘ते’ वक्तव्य शहिदांसह सैनिकांचा अपमान करणारे ; पोलिसांत दोन तक्रारी तक्रार

पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगणा राणावत पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्याबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. (Statements have been made about India’s independence) या वक्तव्यामुळे ती अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात दोन तक्रारी अर्ज दाखल करण्यात आल्या आहेत. (Two complaints against actress Kangana Ranaut in Pune)  

 

 

 

कंगणाला नुकतेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. त्यानंतर कंगणाने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात तिने “भारताला स्वातंत्र्य हे 1947 साली मिळाले नसून, तत्कालीन ब्रिटीश सरकारने दिलेली भिक होती. खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले आहे” असे वक्तव्य केले आहेे. हे वक्तव्य शहिदांसह सैनिकांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवती कॉग्रेसच्या राज्य सरचिटणीस पुजा झोळे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणेचे सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी सायबर पोलिस ठाण्याकडे वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत. (Two complaints against actress Kangana Ranaut in Pune)

 

 

 

 

कंगणा राणावत होणे केलेले स्वातंत्र्याबद्दलचे वक्तव्य हे देशासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांविरोधातील वक्तव्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसह सर्वच स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शहिदांचा तिने अपमान केला आहे. त्यामुळे तिच्यावर त्वरीत गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी तक्रारी अर्जात करण्यात आली आहे. (Two complaints against actress Kangana Ranaut in Pune)

Local ad 1