आदिवासी रुढी, पंरपरा, नृत्य, कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘आदि महोत्सवाचे’ उद्घाटन
पुणे : आदिवासी नागरिकांच्या सामाजिक उन्नतीसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware) यांनी केले. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने (Tribal Research and Training Institute) आयोजित आदि महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड (Tribal Research and Training Institute Commissioner Dr. Rajendra Bharud), मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Chief Executive Officer Ayush Prasad), महिला व बाल कल्याण आयुक्तालयाचे प्रभारी आयुक्त राहुल मोरे (Rahul More, Commissioner in charge of Women and Child Welfare Commissionerate), शिक्षण उपायुक्त आश्विनी भारुड आदी उपस्थित होते. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)
डॉ. नारनवरे म्हणाले,आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आदिवासी विभाग कार्यरत आहे. समाजातील बांधवाना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध जिल्ह्यात यासारखे महोत्सव घेण्यात येत आहेत. आगामी काळात सरलच्या धर्तीवर सामजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग मिळून प्रदर्शन भरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, राज्याच्या विविध कोपऱ्यात आदिवासी समाज विखुरलेला आहे. त्यांच्या रुढी, पंरपरा, नृत्य, कला व संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत आयोजित होणाऱ्या आदि महोत्सवाला महत्व आहे. ‘महाट्राईब्स’च्या माध्यमातून आदिवासी बांधवानी तयार केलेल्या वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत. यातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)
डॉ. भारुड म्हणाले, आदिवासी नागरिकांच्या पारंपरिक वस्तू, नृत्य, खाद्यपदार्थ, जैविक पद्धतीचे कडधान्य व धान्य, कला व संस्कृतीचे संवर्धन, प्रसार-प्रचार करणाऱ्या आदि महोत्सवाचे आयोजन पुण्याच्या सांस्कृतिक नगरीत करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आदिम संस्कृतीचा अभिमान वाटावा, सामाजिक संस्कृतीचे दर्शन व्हावे, आयोजनामागचा उद्देश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)
प्रदर्शानात विविध कलात्मक वस्तु, वनऔषधी, आदिवासी खाद्यपदार्थाचे स्टॉल आहेत. हे प्रदर्शन २७ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे. (Festival of tribal customs, traditions, dance, art and culture)