...

Transfers । उपजिल्हाधिकारी संवर्गातील सोळा अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे Transfers News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे (Resident Deputy Collector of Pune Collectorate Dr. Jayashree Katare) (RDC) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. शुक्रवारी रात्री उशिरा पुणे विभागातील 16 उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यात पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी हिम्मत खराडे यांची वर्णी (Appointment of Himmat Kharade as Resident Deputy Collector of Pune) लागली आहे. (Transfers of sixteen officers of the rank of Deputy Collector)

 

Transfers

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांची नियुक्ती झाली आहे. सध्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांची अंधेरी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. आसवले यांची हवेली उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे. सचिन बारावकर यांच्या बदलीने हे पद झाले रिक्त होते. पंढरपूरच्या उपविभागीय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांची नियुक्ती झाली आहे. सचिन ढोले यांच्या बदलीमुळे हे पदही रिक्त होते. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांची निवासी उपजिल्हाधिकारी, भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.  (Transfers of sixteen officers of the rank of Deputy Collector)

Transfers

 

पुणे विभागातील सोळा उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महसूल आणि वन विभागाचे उपसचिव माधव वीर (Madhav Veer, Deputy Secretary, Revenue and Forest Department) यांनी काल जारी केले. (Transfers of sixteen officers of the rank of Deputy Collector)

Local ad 1