पुणे : सध्या शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू असून, पुणे महसूल विभागातील 45 नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सह सचिव श्रीराम यादव यांनी जारी केले. (Transfers of 45 Naib Tehsildars in Pune Division)
कोणाची कुठे बदली झाली.. (कंसात बदलीचे ठिकाण)
तुषार देशमुख (फलटण उपविभागीय अधिकारी सातारा), सुयोग बेंद्रे (सर्वसाधारण शाखा, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय), दिंगबर सानप (जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर), दयानंद कोळेकर (उपविभागीय अधिकारी सातारा), विजयकुमार धायगुडे (तहसील कार्यालय सातारा) सुधाकर धाईंजे (मोहोळ तहसील कार्यालय), ज्ञानेश्वर शेळकंदे (अधिग्रहण शाखा जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे), संतोष सानप (मंगळवेढा तहसील कार्यालय), राजाभाऊ भंडारे (खटाव तहसील कार्यालय), पी.डी. घम (सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा), रेखा जगताप (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ,पुणे), कुंदा थोरात (मुळशी तहसील कार्यालय, पुणे), सीमा चिंचवडे (नगरपरिषद प्रशासन, विभागीय आयुक्त पुणे), चित्रा ननावरे (पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ), दीपक सोनावले (तहसील कार्यालय महाबळेश्वर), श्रावण ताते (महसूल नायब तहसीलदार मग्रारोहयो पुणे) यांचा समावेश आहे.
गणेश लव्हे (शाहूवाडी, कोल्हापूर), विजय चांदगुडे (उपविभागीय कार्यालय पुरंदर), सचिन मुंढे (जुन्नर-आंबेगाव उपविभागीय कार्यालय), सूर्यकांत कापडे (गगनबावडा तहसील), दुंडाप्पा कोळी (विटा तहसील कार्यालय), राजेंद्र पवार (कडेगाव तहसील कार्यालय), आर.बी. सिद (शिराळा तहसील कार्यालय), बसवंत कोळी (मोहोळ तहसील कार्यालय), महादेव जाधव (पुरंदर तहसील कार्यालय), शीतल देसाई (पुणे शहर तहसील), रावसाहेब चाटे (कवठेमहांकाळ, सांगली), अविनाश डोईफोडे (जावळी तहसील कार्यालय, सातारा).