IPS Transfer। राज्यातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची झाली बदली…

 Maharashtra IPS Transfer | पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणातील आरोपींवर कलम 307 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. परंतु तो गुन्हा मागे घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली. दरम्यान, राज्य पोलिस दलातील तब्बल 30 वरिष्ठ पोलिस (Maharashtra IPS Transfer) अधिकार्‍यांच्या बदल्या मंगळवारी गृह विभागाने केल्या आहेत. त्यात पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri-Chinchwad Police Commissioner Ankush Shinde) यांचाही सहभाग आहे. विशेष म्हणजे एप्रिल 2022 मध्ये शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारला होता. (Transfers of 30 IPS officers in the state)

 

 

 

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची देखील बदली झाली आहे. पुण्यात सीआयडी प्रमुख आणि अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार यांची पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Transfers of 30 IPS officers in the state) रितेश कुमार (अप्पर महासंचालक, सीआयडी ते पोलिस आयुक्त, पुणे शहर), मधुकर पांडे (अप्प्र महासंचालक, आर्थिक गुन्हे, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार), प्रशांत बुरडे (अप्पर महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मुंबई ते अप्पर महासंचालक, सीआयडी, महाराष्ट्र राज्य, पुणे), सत्यनारायण चौधरी (विशेष महानिरीक्षक, सागरी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस सह आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, बृहन्मुंबई), निशित मिश्रा (आयजी, एटीएस, मुंबई ते पोलिस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई), प्रवीण पडवळ (सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई ते सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई), लखमी गौतम (आयजी-आस्थापना ते पोलिस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई), एस. जयकुमार (आयजी, प्रशासन ते पोलिस सह आयुक्त, प्रशासन, बृहन्मुंबई), अंकुश शिंदे (पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड ते पोलिस आयुक्त, नाशिक शहर), प्रवीण पवार (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे ते आयजी, कोकण परिक्षेत्र, कोकण), सुनिल फुलारी (आयजी, मोटर परिवहन, पुणे ते आयजी, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), अनिल कुंभारे (अप्पर आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, मध्ये प्रादेशिक, बृहन्मुंबई), परमजीत दहिया (उप महानिरीक्षक, एटीएस ते अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई), विनायक देशमुख (अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई), राजीव जैन (अप्पर आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई ते अप्पर आयुक्त, उत्तर विभाग, बृहन्मुंबई)

  • सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी.जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.

पदोन्नतीने बदली झालेल्या अधिकारी

सदानंत दाते (पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर-वसई-विरार ते अप्पर महासंचालक, एटीएस, मुंबई), विश्वास नांगरे-पाटील (सह आयुक्त, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर),मिलिंद भारंबे (आयजी, लॉ अ‍ॅन्ड ऑर्डर, महाराष्ट राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, नवी मुंबई), राज वर्धन (सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई ते अप्पर महासंचालक, नि-सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), विनय कुमार चौबे (अप्पर महासंचालक, अ‍ॅन्टी करप्शन, महाराष्ट्र राज्य, मुंबई ते पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), शिरीष जैन (पद स्थापनेच्या प्रतिक्षेत ते सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), संजय मोहिते (विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई ते विशेष महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयात), नवीनचंद्र रेड्डी (अप्पर आयुक्त, नागपूर शहर ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर), आरती सिंह (पोलिस आयुक्त, अमरावती शहर ते अप्पर आयुक्त, सशस्त्र पोलिस, बृहन्मुंबई), नामदेव चव्हाण (अप्पर आयुक्त, पुणे शहर ते उप महानिरीक्षक, सीआयडी, पुणे),  निसार तांबोळी (उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड ते अप्पर आयुक्त, वाहतूक, बृहमुंबई), ज्ञानेश्वर चव्हाण (अप्पर आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई ते अप्प्र आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई),रंजन कुमार शर्मा (उप महानिरीक्षक, सीआयडी ते अप्पर आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई).

 

  •  विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार आणि महेश पाटील यांची बदली करण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढझ्यात येणार आहेत.

 

Local ad 1