Transfers of 13 Deputy Collectors in Pune Division । पुणे : महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार (Deputy Collectors and Tehsildars of the Revenue Department) संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाचे सविच माधव वीर (Savich Madhav Veer of Govt) यांनी जारी केले आहेत. त्यात पुणे विभागातील तेरा उपजिल्हाधिकारी आणि दहा तहसीलदारांचा समावेश आहे.
पुणे विभागातील 10 तहसीलदारांच्या बदल्या ; कोणाची कुठे झाली बदली ?
पुणे विभागातील उपजिल्हाधिकार्यांच्या बदल्यांमध्ये भूसंपादन अधिकारी-2 सातारच्या संगिता राजापूरकर (Sangita Rajapurkar) यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन क्रमांक -3 येथे पदास्थापना देण्यात आली. उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.वनश्री लाभशेटवार (Deputy Collector (Rohyo) Dr. Vanashree Labshetwar) यांची उपजिल्हाधिकारी भूसंपादन – 6 येथे बदली करण्यात आली. त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील ए विंग मधून बी विंगमध्ये जावे लागणार आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप (Shivaji Jagtap) यांची सातारा भूसंपादन क्रं. 2 येथे बदली करण्यात आली. विजय देशमुख (Vijay Deshmukh) हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना उपविभागीय अधिकारी कडेगाव येथे पदस्थापना देण्यात आली.
वाळवाचे (संगाली) उपविभागीय अधिकारी संपत खिलारी (Sampat Khilari) यांची उपजिल्हाधिकारी (महसूल) कोल्हापूर येथे बदली झाली. सोलापूरचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे (bharat waghmare deputy collector) यांची रायगड जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. कोरेगांवचे उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील (Jyoti Patil) यांची उप जिल्हाधिकारी (रोहयो) रायगड येथे बदलीचे आदेश जारी केले आहेत.
पुणे येथील भूसंपादन क्र. 3 उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे (Deputy Collector Subhash Bagde) याची पलघरचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. पुणे भूसंपादन क्र. 1 चे प्रवीण साळुंखे (Deputy Collector Praveen Salunkhe) यांना नंदूरबार उप जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. विटाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांची उपजिल्हाधिकारी (सामान्य) उस्मानाबाद येथे तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले शैलेश सूर्यवंशी यांची बीड येथे उपजिल्हाधिकारी (सामान्य) येथे बदली करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन ढोले यांची फलटण उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली. ढोले यांची गेल्या दिड वर्षात ही तिसररी बदली आहे. सुरुवातीला ते पुणे शहर अन्नधान्य अधिकारी म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता लगचे त्याची फलटण येथे बदली करण्यात आली.
दरम्यान, पुणे विभागातील दहा तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये उज्वला सोरटे यांची राज्य शेती महामंडळ फलटण येथून दक्षिण सोलापूर तहसीलदार या रिक्त पदावर बदली करण्यात आली. सोनाली मेटकरी ह्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना तहसीलदार वाई या ठिकाणी पदस्थापना देण्यात आली. मिनल भामरे या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या, त्यांना तहसीलदार (रजा राखीव) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे पदस्थापना देण्यात आली. अनिलकुमार होळकर यांची शिरोळ तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली. लैला शेख यांची तहसीलदार पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे बदली करण्यात आली.
अजित पाटील यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदारपदाची जबाबदारी देण्यात आली. अनिता देशमुख या प्रतीक्षेत होत्या. त्यांची हवेली (संगायो) येथून खंडाळा तहसीलदार यांना राधानगरीच्या तहसीलदार म्हणून पदस्थापना देण्यात आली. माधवी शिंदे यांची तहसीलदार पन्हाळा येथे बदली करण्यात आली. अमरदीप वाकडे यांची सातारा पुनर्वसन तहसीलदार तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्चना कापसे यांना कवठे महाकाळचे तहसीलदार पदस्थापना देण्यात आली.