पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली ; काँग्रेसच्या मागणीला यश : रोहन सुरवसे-पाटील

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्याने लावून धरली होती. या मागणीची दखल घेत आज अखेर आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले, हे काँग्रेसचे यश आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केले. (Transfer of Director General of Police Rashmi Shukla)