पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते धायरीच्या (Rajaram Bridge to Dhairi) दिशेने जाणाऱ्या सुमारे २१०० मिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रंगरंगोटी आणि दिशा दर्शक फलक बसविण्याचे काम सुरु आहे. हे काम एक महीन्यात पुर्ण हाेईल, त्यानंतर ताे वाहतुकीसाठी खुला केला आहे. यासंदर्भात महापािलकेच्या प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh, Head of Project Department, Pune Municipal Corporation) म्हणाले, ‘‘ या उड्डाणपुलाचे उद्घाटन एप्रिल किंवा मे मध्ये होऊ शकते. यापुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पथदिवे लावणे, रंगरंगोटी करणे आणि दिशा दर्शक फलक बसविण्याचे काम सुरु आहे.’’ (Traffic congestion on Sinhagad Road will be resolved)
महागाईने सामन्यांचे कंबरडे मोडले पण खासदारांचे तब्बल 24 टक्क्यांनी वेतन वाढले !
शहरातील सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलापासून फन टाइम थिएटरपर्यंत उड्डाणपुलाचे (Flyover from Rajaram Bridge to Fun Time Theater) बांधकाम सुरू केले आहे. या उड्डाणपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू करण्यात आले आहे. हा उड्डाणपूल डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु, उड्डाणपुलाचे काम महापालिका प्रशासनाकडून अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने केले जात आहे. या उड्डाणपुलाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. राजाराम पुलाजवळ बांधलेल्या या उड्डाणपुलाच्या भागाचे उद्घाटन विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले होते. सिंहगड रस्ता उड्डाणपूलाची एका बाजू खुली झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
उड्डाणपुलाचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार होईल
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून ११८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राजाराम पूल चौकातील सुमारे ६५० मिटर लांबीचा उड्डाणपूल स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुला केला. त्यानंतर आता या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात लांब असलेला उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. विठ्ठलवाडी येथील कमानीपासून सुरु होणारा हा उड्डाणपूल वडगाव येथे फनटाइम थिएटरच्या समोर उतरतो. या उड्डाणपुलाची लांबी २१०० मिटर इतकी आहे. यामुळे स्वारगेट कडून धायरी, नऱ्हे, खडकवासला आदी भागात जाणाऱ्या वाहनचालकांना इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल, मोरे चौक, शिवा काशीद चौक या पाच चौकांमध्ये सिग्नलला थांबण्याची गरज पडणार नाही. यामुळे या भागातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच वाहनचालकांचा वेळ ही वाचणार आहे. पुढील काही दिवसात पथदिवे लावणे, रस्त्यावर पट्टे मारणे, दिशादर्शक व माहिती दर्शक फलक लावणे अशी कामे केली जाणार आहे. ही काम मार्च महिन्याच्या अखेरीस पूर्ण होतील. तर माणिकबाग ते हिंगणे या धायरी ते स्वारगेट या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार होईल, देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन..? – Inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis..?
सिंहगड परिसरातून मुख्य शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिंहगड रस्ता परिसर वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या परिसरात नागरिकांची मोठी संख्या आहे. या भागातून शहराच्या मुख्य भागात नोकरी करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रासले आहेत. त्यांना वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. आगामी काळात होणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे चर्चा आहे.