वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी या काळात काय करावे आणि काय करु नये याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवाहन केले आहे. विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. (Chance of torrential rain with thunderstorm in Nanded district)
नांदेड : मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 12 ते 16 जुलै या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह मुसळधार Torrential rain ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी (Resident Deputy Collector Pradip Kulkarni) यांनी केले आहे. (Chance of torrential rain with thunderstorm in Nanded district)
Related Posts