भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट ; आपलं सरकार येणार अस अडीच वर्षे उगाच म्हणत नव्हतो
पुणे : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Govt) सत्तेत आल्यापासून सरकार कोसळेल असे सांगत, त्याची तारीख पर तारीख भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Cabinet Minister Chandrakant Patil) यांच्यासह अनेक नेते देत होते. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गट -भाजप यांचे सरकार सत्तेत आले. (Toppling the Shiv Sena government was not easy : Chandrakant Patil)
भाजपचे नेते तथा कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Cabinet Minister Chandrakant Patil) यांनी गौप्यस्फोट केला आहे. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानिमित्त पाटील यांचा पुणे शहर भाजपच्या (Pune City BJP) वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
राज्यात भाजपचे (BJP) सरकार आणण्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नियोजन सुरु होते, असे चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांनी सांगितले. दोन अडीच वर्षे मी म्हणत होतो, आपलं सरकार येणार, मी काही वेडा नव्हतो, मला माहिती होत की आपलं सरकार येणार. अडीच वर्ष खरंच आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत होतो. अडीच वर्षे लागले पण सरकार आणले, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले.
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात सरकार पडण्याच्या तारखा जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये चंद्रकांत पाटील आघाडीवर होते. त्यांनी अनेकदा याविषयी भविष्यवाणी केली होती. परंतु, संबंधित तारखांना ठाकरे सरकार न पडल्यामुळे सत्ताधारी नेत्यांकडून त्यांची कायम खिल्ली उडवली जायची.
तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध केलेल्या बंडामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ५० आमदार फोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची सरकार पडण्याची भविष्यवाणी उशीरा का होईना, खरी ठरली आहे., त्यातच त्यांनी आमचे अडीच वर्षापासून नियोजन सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. (Toppling the Shiv Sena government was not easy : Chandrakant Patil)