Tokyo Olympics 2021: भारतासाठी रविवार ठरला निराशाजनक
Tokyo Olympics 2021 : टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) तिसऱ्या दिवशी भारताच्या पदरी निराशा आली. भारतीय खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. रविवारच्या (25 जुलै) संपूर्ण दिवसात भारतीय खेळाडूंनी़ अनेक खेळांमध्ये सहभाग घेतला. निशानेबाजीच्या दोन स्पर्धांमध्ये भारताला पदक जिंकण्याची संधी होती, त्यात यश आले नाही. निशानेबाजीसह टेनिस, बॉक्सिंग आणि हॉकी खेळांमध्येही भारताच्या पदरी निराशाच आली. केवळ बॉक्सर मेरी कोमने (Mary Kom) आणि पीव्ही सिंधू (PV Sindhu) या दोघींनी विजयाने स्पर्धेची सुरुवात केली.
सहा वेळा विश्व चॅम्पियन आणि लंडन ओलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कॉमने 51 किलोग्राम वर्गात पहिल्याच सामन्यात डोमिनिका रिपब्लिकच्या मिग्यूलिना हेरनांडिज हीला 4-1 ने मात दिली. पुरुषांमध्ये मात्र 63 किलोग्राम वर्गात मनीष कौशिकला ग्रेट ब्रिटेनच्या बॉक्सरने 4-1 ने मात देत पराभव चाखायला लावला. (Tokyo Olympics 2021)
टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत मनिका बत्राने अप्रतिम प्रदर्शन करत विजय मिळवला. दुसऱ्या फोरीत युक्रेनच्या खेळाडूला मात देत सामना जिंकला. तर पुरुष एकेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलेल्या जी साथियनला 7 फेऱ्या चाललेल्या सामन्यात अखेर पराभव पत्करावा लागला. (Tokyo Olympics 2021)
बॅडमिंटन महिला एकेरीमध्ये भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधूने अवघ्या 28 मिनिटाच इस्त्राईलच्या सेनियाला मात देत विजय मिळवला. सिंधूने 21-7,21-10 च्या फरकाने सामना जिंकला. दरम्यान, अरविंद सिंग आणि अर्जुन लाल यांनी लाइटवेट पुरुष दुहेरीमध्ये स्कल के रेपेचेज राउंड मध्ये 6:51:36 च्या टायमिंगने तिसरे स्थान पटकावत सेमीफायनलसाठी पात्रता मिळवली. (Tokyo Olympics 2021)
निशानेबाजीत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या दोन युवा निशानेबाज मनु भाकर आणि यशस्विनी देसवाल पात्रता फेरीतच बाहेर गेल्या. पुरुषांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये दीपक कुमार आणि दिव्यांश पवार हे दोघांनाही पराभव पत्कारावा लागला. टेनिसमध्ये सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांची जोड़ी पहिल्या राउंडमध्येच स्पर्धेबाहेर गेली. यूक्रेनच्या टेनिसपटूंविरुद्ध 6-0 ने पहिला सेट भारताने जिंकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये युक्रेनने 7-6 आणि 8-10 च्या फरकाने विजय मिळवला. (Tokyo Olympics 2021)
पोहण्याच्या स्पर्धेत भारताकडून माना पटेल ही महिला वर्गात 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तिच्या हीटमध्ये दुसऱ्या स्थानावर होती. मात्र सेमीफायनलमध्ये पात्रता मिळवण्यापासून ती थोडक्यात चूकली. तर पुरुषांमध्ये श्रीहरि नटराजने 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत तिसऱ्या हीटमध्ये 54.31 सेकंद वेळ घेत सहावं स्थान मिळवलं ज्यामुळे तो 27 व्या स्थानावर राहिला आणि त्यामुळे स्पर्धेत यश मिळवू शकला नाही. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पक्समध्ये पहिल्याच सामन्यात न्यूझीलंड संघाला नमवत विजयी सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला. (Tokyo Olympics 2021)