नांदेडकरांसाठी चांगली बातमी । आज एक हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोना मुक्त
Good news । नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 834 अहवालापैकी 353 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 276 तर अँटिजेन तपासणीद्वारे 77 अहवाल बाधित आले आहेत. (Good news for Nandedkar. Today more than a thousand patients corona free)
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 854 एवढी झाली असून यातील 94 हजार 694 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 495 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Good news for Nandedkar. Today more than a thousand patients corona free)