...

तंबाखू (Tobacco) सेवन करणे 15 व्यक्तींना पडले महागात

नांदेड : सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालय परिसरात धम्रपान करण्यास बंदी आहे. तंबाखू सेवन करताना किंवा धुम्रपान करताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तंबाखु (Tobacco) सेवन करणाऱ्या 15 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

जिल्हास्तरीय तंबाखू (Tobacco) नियंत्रण पथकामार्फत कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार दंडात्मक कार्यवाही नुकतीच करण्यात आली. या कार्यवाहीत 2 हजार 850 रुपयाचा दंड आकारण्यात आला.

जिल्हा सल्लागार डॉ. साईप्रसाद शिंदे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. उमेश मुंडे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड तसेच अन्न व औषध विभागाकडून सहाय्यक आयुक्त प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न संरक्षण अधिकारी उमेश कावळे आदी उपस्थित होते. (Tobacco)

सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री, सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालयात तक्रार नोंदवून जिल्हा तंबाखू  (Tobacco) मुक्त करण्याच्या या अभियानास व कोरोना संक्रमनास प्रतिबंध करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

Local ad 1