रानभाजी महोत्सवात दुर्मिळ भाज्या खरेदीची संधी

नांदेड : कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुई आवळी इ. कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्याळ व फूलभाज्या व ड्रँगन फ्रुट रानफळांची व शेतकऱ्यांनी विविध उत्पादीत केलेला माल, सेंद्रीय उत्पादने, गुळ, हळद, लाकडी घाण्याचे करडीचे तेल, गहू, सर्व डाळी व भुईमुगाच्या शेंगा, मुगाच्या शेंगा व केळीचे वेफर्सचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. (Opportunity to buy rare vegetables at Ranbhaji Mahotsav)

 

जागतिक अदिवासी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परीसरात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार मोहनराव हंबर्डे व बालाजी कल्याणकर (MLAs Mohanrao Humberde and Balaji Kalyankar) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, (Collector Dr. Vipin Itankar) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, (Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur-Ghuge) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांची उपस्थिती होती. (Opportunity to buy rare vegetables at Ranbhaji Mahotsav)

 

 

एरवी दुर्मीळ असलेल्या रानभाज्यातील कुरडूपासून वाघाटेपर्यंतच्या रानभाज्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जल, जंगल, जमीन यातील जैवविविधतेला जपत आदिवासी बांधवांनी रानभाज्याचे महत्व आणि त्यातील आयुर्वेदिक तत्व जपून ठेवले आहे. आदिवासी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रानभाजी महोत्सवात श्रावणात उपलब्ध असणाऱ्या बहुतांश रानभाज्या येथे विक्रीसाठी ठेवण्यात आल्या. (Opportunity to buy rare vegetables at Ranbhaji Mahotsav)

 

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नााचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश होतो. सध्यााच्या परिस्थितीमध्ये रानातील म्हाणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या्, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्यन नागरिकांना होणे आवश्यक आहे.

रानभाज्यांचा समावेश हा त्यात-त्या भागातील शेतकऱ्यांचे आहारात होत असतो. रानभाज्यांमध्ये. विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत अल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे रानभाज्या पुर्णपणे नैसर्गिक असतात. यात शेतकरी गट व महिलागटांचा सक्रिय सहभाग आहे. हा महोत्सव सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत सुरु राहणार आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगितले. (Opportunity to buy rare vegetables at Ranbhaji Mahotsav)

 

 

 

Local ad 1