-
Online Scams : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून, ऑनलाईन फसणूक ( Online Scams) होत आहे. ही फसवणूक ईमेलद्वारे, फोन, सोशल मीडिया अकाऊंट (Email, phone, social media account) यावरुनही गंडा घातला जात असल्याच्या घटना समोर येत आहे. या फसणुकीला ’फिशिंग’ (Fishing) असे म्हणतात. (To avoid online scams, don’t be shy)
ज्या व्यक्तीची फिशिंग करणार असतात त्याला चूकीची माहिती पुरवली जाते. तसेच अनेकदा ओळखीच्या व्यक्तीकडून ईमेल किंवा सोशल मीडियावर मेसेज येतो. आपणही व्यक्ती ओळखीची असल्याने सर्व काही शेअर करतो. त्यानंतर आपली सर्व माहिती त्याच्याकडे पोहोचली जाते. उदाहरणार्थ जसे की तुमच्या बॉसकडून तुम्हाला ईमेल आलेला असतो, त्यामुळे तुम्ही जे विचारले जाते ते कोणताही विचार न करता उत्तर देऊन टाकता. ज्यामुळे तुमची सर्व माहिती समोरच्याला मिळून जाते. (To avoid online scams, don’t be shy)
फिशिंग पासून बचाव करता कायम सतर्क रहाणे आवश्यक आहे. जसेकी कोणत्याही अनोळखी इमेल, फोननंबरशी संपर्क करताना सावधानता बाळगली पाहिजे. अनेकदा आधुनिक फोन्स आणि लॅपटॉप्समध्ये अनोळखी आणि संशयास्पद मेल किंवा नंबरवरुन कॉन्टॅक्ट झाल्यास स्पॅम किंवा फ्रॉड अशाप्रकारे सूचला दिली जाते. त्याला गंभीररित्या घेऊन संबधित मेल किंवा नंबरला रिपोर्ट आणि ब्लॉक केले पाहिजे. तसेच सर्व खात्यांचे मग सोशल मीडिया अकाऊंट किंवा बँक अकाऊंट या सर्वांचे पासवर्ड अगदी स्ट्राँग ठेवून ते वेळोवेळी बदलले देखील पाहिजेत. (To avoid online scams, don’t be shy)