लोहा तालुक्यात वीज कोसळून तीन ऊस कामगार ठार
लोहा : तालुक्यातील धावरी तांडा परिसरात काम करणाऱ्या उसतोड मजुरांवर मंगळवारी (दिनांक 18 ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास वीज कोसळली. यात तीन जण ठार झाले. तर जखमी बालिकेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (Three sugarcane workers died due to lightning in Loha taluka)
Related Posts
लोहा तालुक्यातील धावरी तांडा शिवारामध्ये काही ऊसतोड मजूर काम करत होते. सायंकाळी अचानक वादळी वारे, विजेच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. एका झाडाचा आसरा घेण्यासाठी कामगार माधव पिराजी डुबुकवाड (वय 45) राहणार पानभोसी, तालुका कंधार, मोतीराम शामराव गायकवाड (वय 46) राहणार पेठ पिंपळगाव तालुका पालम जिल्हा परभणी आणि दहा वर्षीय बालिका रूपाली पोचिराम गायकवाड हिच्यावर वीज पडली. यात दोघांचा ही होरपळून मृत्यू झाला. तर पूजा माधव डुबुकवाड ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तीनही मृतदेह लोहा रुग्णालयात आणण्यात आले असून तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षक व या भागातील सरपंच, पोलीस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे लोहा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. (Three sugarcane workers died due to lightning in Loha taluka)