नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा बळी
किनवड तालुक्यात प्रशासन पोहोचले आदीवासी पाड्यांवर
नांदेड : किनवट तालुक्यामध्ये वीज कोसळून तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. अंगावर वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी बचाव कसा कारावा, या विषयी जनजागृती करण्यासाठी किनवट तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांंनी (kinwat tehsil administration ) तातडीने आदिवासी पाड्यांना (Tribal Pade) भेटी दिल्या व नागरिकांशी संवाद साधला. Three farmers killed in power outage in Kinwat talukae
दरम्यान, मुदखेड तालुक्यातील मुगट इथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू (Death of a farmer) झाला आहे. 55 वर्षीय दत्ता ढेपाळे हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज केेसळली. त्यात ढेपाळे यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास मुगट गावात अचानक मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये दत्ता ढेपाळे आणि त्यांचा मुलगा होता. पाऊस आल्याने ते बैलाला घेऊन झोपडीकडे येत असताना दत्ता ढेपाळे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. Three farmers killed in power outage in Kinwat taluka
माॅन्सुन वेळेवर दाखल झाला परंतु त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. पहिल्या पावसावरच पेरणी केलेला बळीराजा चिंतांग्रस्त झाला होता. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान दितस असतानाच किनवट तालुक्यातील शिवणी आणि दयाळ धानोरा या वनक्षेत्र बहुल गावात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सांत्वन तहसीलदारांनी केले आहे. पीडित कुटुंबाची माहिती घेऊन त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात येईल, असेही तहसीलदारांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. Three farmers killed in power outage in Kinwat taluka
वीजेपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी
विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. Three farmers killed in power outage in Kinwat taluka