...

सुवर्ण संधी । रोजगार मेळाव्यातून साडेतीन हजार युवकांना मिळणार रोजगार

नांदेड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेडच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री अशोक चव्हाण (Guardian Minister Ashok Chavan) यांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदेड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. (Three and a half thousand youths will get employment in the job fair)

 

तुम्ही उद्योजक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या का महत्वाची

 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर (Zilla Parishad President Mangarani Ambulagekar), आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर (MLA Amar Rajurkar, MLA Mohan Humberde, MLA Balaji Kalyankar), महापौर जयश्री पावडे (Mayor Jayashree Pawade), माजी मंत्री डी. पी. सावंत (Former Minister d. P. Sawant), जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar), विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी (Special Inspector General of Police Nisar Tamboli), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे (Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur-Ghuge), जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे (District Superintendent of Police Pramod Shewale), मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने (Municipal Commissioner Dr. Sunil Lahane), कौशल्य विकासचे सहायक संचालक रेणुका तम्मलवार (Renuka Tammalwar, Assistant Director, Skill Development) आदी उपस्थित होते.

 

 

 

या रोजगार मेळाव्यात एकुण 32 नामांकित कंपन्यांमध्ये एकुण 3 हजार 550 रिक्त पदांची ऑनलाईन भरती होणार असल्याची माहिती रेणुका तम्मलवार यांनी दिली. दिनांक 26 ते 29 जानेवारी असे तीन दिवस ऑनलाईन रोजगार मेळावा सुरू राहणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही संधी असून, ऑनलाईन अर्ज करुन रोजगार मिळविण्याची संधी आहे.

Local ad 1