नांदेड-हडपसर एक्सप्रेस रेल्वेचे असे आहे वेळापत्रक, जाणून घ्या !

नांदे्ड : नांदेडवरुन पुण्याला किंवा पुणे येथून नांदेडला रेल्वेने प्रवास करणार असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.  नांदेड-पुणे एक्सप्रेसचे  (Nanded-Pune Superfast Express) रूपांतर आता नांदेड-हडपसर एक्सप्रेसमध्ये (12730/ Hazur Sahib Nanded – Hadapsar (Pune) SF Express) करण्यात आले असून, पुर्वीप्रमाणेच आठवड्यातून दोन दिवस ही रेल्वे धावणार आहे. 

Nanded Express। नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेस हडपसर येथून धावणार ; प्रवाशांसाठी हा निर्णय गैरसोयीचा

 

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. मात्र,  या रेल्वेच्या वेळतही बदल करण्यात आला असून, कसे असेल नवीन वेळापत्रक जाणून घेऊया…. (This is the schedule of Nanded-Hadapsar Superfast Express)

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देखमुख यांना कोरोनाची बाधा

 

पूर्वी धावत असलेली नांदेड-पुणे रेल्वेची वेळ बदलून आणि नवीन आधुनिक एलएसबी तंत्रज्ञानाचे बोगीसह ही रेल्वे धावत आहे. रविवार आणि मंगळवार रोजी नांदेडहून नवीन गाडी आता रात्री ९.३० ऐवजी सायंकाळी ६.३० वाजता सुटेल. पुणे येथे सकाळी ९.४० वाजता पोहचणारी सुपर फास्ट गाडी आता सकाळी ७ वाजता हडपसरला पोहोचेल. (This is the schedule of Nanded-Hadapsar Superfast Express)

 

Nanded corona update । नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित

नवीन रेल्वे परतीच्या प्रवासाला हडपसरहून सोमवार आणि बुधवारी रात्री 10 वाजता निघेल, यापूर्वी ही पुणे स्थानकावरून ही रल्वे रात्री १० वाजता निघेल.  (Departure from Hadapsar on Monday and Wednesday at 10 p.m.)  हडपसर वरुन निघालेली रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी पुर्वीप्रमाणेच सकाळी दहा वाजता नांदेड रेल्वेस्थानकावर ९Nanded Railway Station)  पोहोचेल. तर ही रेल्वे नांदेडहून रविवारी आणि मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता निघेल. (This is the schedule of Nanded-Hadapsar Superfast Express) त्यानंतर दुसऱ्या दिवशी साखाळी सात  वाजता पोहोचणार आहे.

नांदेड येथून विस डब्यांची गाडी पूर्णा (सायं. ७ वा.) परभणी (१९.२८), सेलू (२०.०४), परतूर (२०.२४), जालना (२१.१३), औरंगाबाद( २२.२०), अंकाई(१), मनमाड( रात्री १.१५), कोपरगाव (१.२३), बेलापूर(२.१३) अहमदनगर(३.१०), दौंड कॉर्ड लाईन( ५.३८) हडपसर (६.५५)  येथे पोहणाचणार आहे. (This is the schedule of Nanded-Hadapsar Superfast Express)

Local ad 1