...

पंधरा ते अठरा वर्षातील मुलांच्या लसीकरणासाठी अशी करा नोंदणी

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे. परंतु लसीकरणाठी नोंदणी कशी।करावी, असा प्रश्न पडला आहे.  (This is how young people between the ages of 15 and 18 register for vaccination) 

याविषयी आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे. (This is how young people between the ages of 15 and 18 register for vaccination)

विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील, त्यामुळे नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा (आइडेंटिटी प्रूफ) म्हणून ग्राह्य धरले जाईल, असे डॉ. शर्मा यांनी असे स्पष्ट केले आहे. (This is how young people between the ages of 15 and 18 register for vaccination)

 

 

अशी आहे लस नोंदणी प्रक्रिया

टप्पा  – सर्व प्रथम Covin App वर जा. तुमचा मोबाईल नंबर टाका. ओटीपी येईल आणि तो टाकून लॉग इन करा.

टप्पा – आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.

 

टप्पा – तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर जेंडर आणि जन्मतारीख निवडा.

 

टप्पा ४ – मेंबर एॅड झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

टप्पा ५ – आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करा.

टप्पा ६ – लसीकरण केंद्रावर, तुम्हाला संदर्भ आयडी आणि सीक्रेट कोड प्रदान करावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.

टप्पा ७ – त्याचप्रमाणे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून त्यांच्या लसीकरणाची नोंदणी करू शकता.

Local ad 1