राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( Nationalist Congress) नऊ आमदार सहभागी झाले. त्यानंतर मंगळवारी पहिलीच मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting) झाली. त्यात आज महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. (‘This’ decision was taken by the state cabinet)

 

 

 

 

ऊर्जा विभाग । राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर. देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन.

नियोजन विभाग । मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना. 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती

जलसंपदा विभाग । दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मान्यता

उद्योग विभाग । नागपूर येथील मे.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचार्‍यांना शासन सेवेत सामावून घेणार

विधि व न्याय विभाग । सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ

महसूल विभाग । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमिनीबाबत निर्णय.

कृषि विभाग । नागपूर कृषि महाविद्यालय येथे  आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र

पदुम विभाग । मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता 25 वर्षे

 

Local ad 1