आरोग्याच्या सुविधेत कमतरता पडू देणार नाही : अशोक चव्हाण
नांदेड : गत दोन वर्षात कोरोनासारख्या आव्हानातून सावरत आहोत. आरोग्याच्या या संकटाशी सामना करतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व सेवा-सुविधेत कोणतीही कमतरता पडणार नाही, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण (Public Works Minister and Guardian Minister Ashok Chavan) यांनी दिले आहे. (There will be no shortage of health facilities : Ashok Chavan)
ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे. आरोग्य, पिण्याचे पाणी, सुधा प्रकल्पासह पिंपळढोह प्रकल्पाची उंची वाढवून पाण्याचे नियोजन भक्कम करणे, गाव तिथे स्मशानभूमी, पांदण रस्त्यांचा विकास एवढी महत्वाची कामे डोळ्यासमोर ठेवून यात अधिक चांगला बदल येत्या काही दिवसातच तुम्हा सर्वांच्या प्रत्ययास येईल, अशी ही ग्वाही चव्हाण यांनी दिली आहे. (There will be no shortage of health facilities : Ashok Chavan)
सावरगावमाळ येथे प्राथमिक उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी गावात जागा उपलब्ध नव्हती. गावातील आरोग्याच्या सुविधेला अधिक नव्या स्वरुपात करता यावे, नव्या इमारतीला जागा मिळावी या उदात्त हेतूने गावातीलच बालाजी विठोबा कोल्हाटकर व त्यांच्या परिवाराने त्यांच्या मालकीची असलेली 5 गुंठे जमीन गावाच्या सेवेपोटी दवाखाण्यास विनामोबदला उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या निर्णयाचे आणि सामाजिक कृतज्ञतेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कौतूक करून यथोचित सत्कार केला. (There will be no shortage of health facilities : Ashok Chavan)
भोकर व इतर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे याची मला कल्पना आहे. मागील चार वर्षांपासून याविषयीचा मी सातत्याने पाठपुरावा करून मागील वर्षी सुधा प्रकल्प, पिंपळढोह प्रकल्प यांची उंची वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. ही उंची वाढविल्यामुळे आता पाण्याचा साठाही अधिक प्रमाणात उपलब्ध होईल. या दोन प्रकल्पांसह इतर जलसंधारणाच्या प्रकल्पाबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला आहे. याबाबत आवश्यक ते शासन निर्णयही निर्गमीत झाले असून येत्या काही दिवसात या कामाचेही भूमीपूजन करून त्यात नवा बदल तुम्हाला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. (There will be no shortage of health facilities : Ashok Chavan)