Mumbai-Pune Expressway। ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वरील टोलमध्ये होणार वाढ !
पुणे : ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा (Mumbai-Pune Expressway) प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिश्याला भार पडणार आहे. नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 18 टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार (18 percent more will be charged for toll) आहे. (There will be an increase in the toll on the Mumbai-Pune Expressway!)
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Department of Public Works) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (Mumbai-Pune Expressway) टोलमध्ये दर तीन वर्षांनी 18 टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. याआधी 1 एप्रिल 2020 मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र 1 एप्रिल 2023 ला लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम असतील, अशी माहिती समोर आली आहे.(There will be an increase in the toll on the Mumbai-Pune Expressway!)
पुणे (Pune) मुंबई (Mumbai) शहरांना जोडणारा हा महत्वाचा दुवा मानला जातो. परंतु वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ (Mumbai-Pune Expressway) कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र त्यावर तोडगा काढला जात नाही. सुविधा पुरवल्या जात नाहीत. मात्र टोल वाढ नित्यनियमाने केली जाते. यंदा किमान सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. (There will be an increase in the toll on the Mumbai-Pune Expressway!)
टोलचे जुने आणि नवीन दर
चारचाकी वाहनाला सध्या 270 रुपये टोल आहे. परंतु आता 1 एप्रिलपासून 320 रुपये होणार आहे. टेम्पोला 420 रुपयांवरून 495 रुपये मोजावे लागणार आहेत. ट्रकसाठी 580 रुपयांवरून 685 करण्यात आले आहे. बसला 797 रुपये टोल शुल्क होते. त्यात आता 137 रुपयांची वाढ करण्यात आली असून, 940 रुपये भरावे लागणार आहे. थ्री एक्सेल साठी 1380 रुपयाऐवजी आता 1630 रुयये मोजावे लागणार आहेत. एस एक्सेल साठी 1835 रुपये टोल आहे. परंतु वाढ होईन 2165 रुपये भरावे लागणार आहेत.