...

Crude Oil Price । कच्चा तेलाच्या घसरण तरीही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात नाहीच… राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल कुठे मिळतो..

Crude Oil Price । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण (Crude Oil Price) सुरू आहे. मात्र, याचा लाभ ग्राहकांना होताना दिसत नाही. तर दुसरीकडे राज्यातील सर्वाधिक महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात मिळत आहे. (Even though crude oil is falling, there is no reduction in petrol-diesel prices)

 

 

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मागील काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात (Crude Oil Price) होत असलेल्या घसरणीचा फायदा ग्राहकांना मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात थोडीही वाढ झाली की, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली जाते. रविवारी सकाळी सहा वाजता देशातील इंधन कंपन्यांनी आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Today Petrol Diesel) जाहीर केले आहेत. आज इंधन दर स्थिर असून कोणताही बदल झाला नाही. (Even though crude oil is falling, there is no reduction in petrol-diesel prices)

.

 

उपराजधानी नागपूर शहरात पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर मिळत आहे.पुण्यात पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर दर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर, तर सर्वाधिक महाग परभणी जिल्ह्यात पेट्रोल  109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर खरेदी करावे लागत आहे. (Even though crude oil is falling, there is no reduction in petrol-diesel prices)
Local ad 1