‘आत्म’हत्येसाठी तरुणी सिंहगडावर आली ; पहारेकऱ्याला आला संशय अन् चक्र गतीने फिरल्याने वाचले तरणीचे जीव
पुणे : सिंहगडावर ‘आत्म’हत्या करण्याच्या इराद्याने आलेल्या एका तरुणीला ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’कडून (Indrani Balan Foundation, Puneet Balan Group) नेमण्यात आलेल्या पहारेकऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश मिळाले. संबधित तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते पुढील तपास करीत आहेत. (The young woman came to Sinhagad for suicide)
‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’ (Indrani Balan Foundation, Puneet Balan Group) यांच्या माध्यमातून सिंहगडासह काही महत्वाच्या ठिकाणांच्या स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ९ ऑक्टोबर) दुपारी हे कर्मचारी सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचे या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्यांनी तरुणीला विचारणा केली असता तिने उडवाउडवीची उत्तरे देत ती कल्याण दरवाजाच्या दिशेने निघून गेली. (The young woman came to Sinhagad for suicide)
त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले, त्यांनी तत्काळ गडावरील ‘चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट’ (Chandrarang Charitable Trust) व इतर कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन या तरुणीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. तरुणी एका बुरूज आणि दरीच्या ठिकाणी उभी राहून खूप वेळ मोबाईलवर बोलत रडत उभी होती. कुठल्याही क्षणी ती दरीत उडी मारू शकते अशी परिस्थिती होती, मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दिलेल्या माहितीमुळे वन विभाग आणि पोलिस पाटील जागेवर पोहचले. त्यांनी या तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र, ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ व ‘पुनीत बालन ग्रुप’च्या पहारेकरी कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे तरुणीला वाचविता आले. त्यामुळे गडावरील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.
‘‘सिंहगडावरील स्वच्छता आणि सुरक्षेसाठी (Cleanliness and safety at Sinhagad) नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या तरुणीला वाचवले. ज्या उद्देशाने आम्ही ऐतिहासिक ठिकाणी कर्मचारी नेमले आहे, तो उद्देश साध्य होत आहे. कर्मचाऱ्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. एका तरुणीचे धोक्या आलेले प्राण त्यांनी वाचवल्याने मी या कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो, त्यांच्या सतर्कतेला सलाम करतो आणि त्यांचे आभारही मानतो.’’
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप