आठ वर्षांनी पतीच फुटलं ‘बिंग’ ; पत्नीन गाठलं पोलीस स्टेशन

पुणे Pune Crime News : पती – पत्नीच्या नात्याकडेे विश्वासाच नात म्हणून पाहिले जाते. (The relationship of husband and wife is seen as the relationship of faith,) परंतु पतीच पत्नीवर किंवा पत्नीच पत्नीवर अविश्वास असेल तर काय होत, हे अनेक घटनांतून समोर आल आहे. अशी प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतरच चर्चेत येतात. असाच प्रकार पुण्यातील कोथरूड परिसरातून समोर आलं आहे. काय आहे, ते प्रकरण जाणून घेऊ या

 

 

 

कोथरूड भागात राहणार्‍या एका पतीने आठ वर्षांपूर्वी आपल्या पत्नीला एक मोबाईल भेट दिला. (Husband gave mobile gift to wife) त्या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचा अ‍ॅप (Spy app and recorder) डाऊनलोड केल होतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून ८ वर्षांपासून पत्नीची गोपनीय माहिती मिळवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पतीने हा प्रकार केल्याचे समोर आले. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) पत्नीच्या फिर्यादीवरून पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Eight years later the husband’s actions were revealed; The wife reached the police station)

 

 

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती पत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे पती वारंवार पैशांची मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. तसेच आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घ्यायचा. त्यावरुन त्याने शिवीगाळ करत अनेक वेळा मारहाण देखील केल्याची तक्रार करण्यात आली आहे.फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट दिला. त्या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर (Spy app and recorder) नावाचे अ‍ॅप अगोदर डाऊनलोड करुन ठेवण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे पत्नीची सर्व माहिती परस्पर आरोपी पती त्याच्या स्वत:च्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये घेतल्याचे फिर्यादी पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर पत्नीने पती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (Kothrud Police Station)

Local ad 1