...

हिंजवडीतील टेम्पो ट्रॅव्हल्स दुर्घटने मागील सत्य जाणून थरकाप उडेल ; चौघांचा होरपळून मृत्यू

पिंपरी : हिंजवडीत कामावर निघालेल्या कामगाराच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात असल्याचं बोललं जात असतानाच पोलिसांच्या चौकशीतून जे सत्य समोर आले आहे, ते पाहून थरकाप उडेल. हिंजवडी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या दुर्घटने मागील सत्य सांगितले आहे. (The truth behind the Tempo Travels accident in Hinjewadi will make you tremble)

हापूस आंबा ओळखा आता युनिक आयडीद्वारे

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आयटी हब असलेल्या हिंजवडीतील फेज वन च्या जवळच भरधाव टेम्पो ट्रॅव्हल ने पेट घेतला होता. ट्रॅव्हल्स मधून चालकाने उडी घेऊन स्वतःचा जीव वाचवला होता. इतर काही जणांनी देखील स्वतःला वाचवण्यासाठी धावत्या ट्रॅव्हल्स मधून उड्या घेतल्या होत्या. याच दरम्यान चार जणांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमध्ये आतापर्यंत सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  घटनेत जागीच चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हिंजवडीतील व्योम ग्राफिक्स या कंपनीतील कामगारांना वारजे माळवाडी येथून घेऊन येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हल्स बसच्या अपघातात प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. दिवाळीचा पगार न दिल्याने चालकानेच ट्रॅव्हल्स पेटवली होती असा मोठा खुलासा पोलीस चौकशीत झाला आहे. बसचालक जनार्दन हंबर्डीकर असे चालकाचे नाव आहे.

शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. नर्‍हे आंबेगाव), गुरुदास खंडू लोखरे (वय ४०, रा. हनुमाननगर, पौड फाटा) सुभाष सुरेश भोसले (वय ४५, रा. त्रिलोक सोसायटी, वारजे माळवाडी), राजेंद्र सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) अशी मृत्युमुखी पडलेल्या चार कामगारांची नावे आहेत.

चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज एक मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता. कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची समोर आले.

Local ad 1