ACB च्या सापळ्यातून सुटला अन् चौकशीत अडकला !
भोकर : बिल्डींग मटेरीयल (Building material) सप्लायरचे टिप्पर वाहन चालविण्यासाठी लाच (Bribe) मागितली होती. परंतु ऐनवेळी ती स्विकारली नाही. त्यामुळे अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Amravati Bribery Prevention Department) लावलेल्या सापळ्यातून पोलिस हवालदार (Police constable) वाचला. परंतु तक्रारीची पडताळणी केल्यानंतर यापुर्वी लाच (Bribe) स्विकारल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे लाचखोर हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (He escaped from the trap of bribery and got stuck in interrogation)
रघुनाथ दिगंबरराव वानखडे (Raghunath Digambarrao Wankhade) (वय ५७) पोलीस हवालदार, ब.न. १७६७, नेमणुक पोलीस स्टेशन भोकर, राहणार प्लॉट नंबर १७, राजसारथी नगर, तरोडा बु. जि. नांदेड, असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. (He escaped from the trap of bribery and got stuck in interrogation)
नांदेडमध्ये कोरोना चाचण्या घटल्या ; आज किती रुग्ण सापडले, जाणून घ्या…
भोकर पोलिस ठाणे हद्दीत बिल्डींग मटेरीयल सप्लायरचे टिप्पर वाहन चालविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे हवालदार वानखेडे याने लाच (Bribe) मागितल्याची तक्रार अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकेड 5 जानेवारी लाच (Bribe) मागणीची पडताळणी करण्यात आली.त्यात पोलीस हवालदार वानखडे याने तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रूपये लाच (Bribe) घेतल्याचे कबुल केले. तसेच उर्वरीत १३ हजार साहेबांचे आणि स्वःसाठी एक हजार रुपये लाचेची (Bribe) मागणी केली होती. त्यानुसार सापळा लावण्या आला होता. मात्र, लाचखोर पोलीस हवालदार याला तक्ररदार यांचेवर संशय आल्याने लाचखोर पोलीस हवालदार याने लाचेची (Bribe) रक्कम स्विकारली नाही. मात्र, वानखडे याने पडताळणी दरम्यान लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाल्याने त्याचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सूरू करा : कोळगिरे