जागतिक वेबिनारमध्ये आज उलगडेल ‘बीजेएस वॉटर मॉडेल’चा यशस्वी प्रवास!

 

पुणे : जागतिक पातळीवरील प्रसिद्ध असलेली आणि २ लाख आयआयटी अलुमनी असलेली संस्था व्हील्स ग्लोबल फाउंडेशन, अमेरिका आयोजित चौथ्या जागतिक वेबिनारमध्ये भारतीय जैन संघटनेचे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री शांतिलाल मुथ्था ‘बीजेएस वॉटर मॉडेल’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. (The successful journey of ‘BJS Water Model’ will be revealed today in the global webinar!)

 

 

‘जलसंकट हाताळण्यासाठी नवकल्पना आणि सहयोगी शासन’ असा वेबिनारचा विषय असून शनिवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता व्हील्स ग्लोबल फाउंडेशनच्या फेसबुक पेजवर लाईव्ह होणार आहे. यात मोठ्या संख्येने आयआयटी अलुमनी आणि अनेक मान्यवरही सहभागी होणार आहेत.

 

 

जल संवर्धन, जल व्यवस्थापन या क्षेत्रांत बीजेएसचे कार्य देशपातळीवर पोहोचले असून अनेक राज्य सरकार, केंद्र सरकार, नीती आयोग यांनी विशेष दखल घेतली आहे. बीजेएसने ‘तलावांचे पुनरुज्जीवन’ करण्याचे परिपूर्ण मॉडेल विकसित केले असून या क्षेत्रातील देशपातळीवरील ब्रॅंड ठरला आहे. श्री मुथ्था यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा लाभ या वेबिनारच्या माध्यमातून घेता येणार आहे.

Local ad 1