पुण्यात कोणाला आणायचं?, सनदी अधिकाऱ्यांचा शोध संपेना !

पुणे : राज्यात सत्तातर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांचे सरकारने आले. सत्तांतर झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या हा अलिखित नियम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Govt) नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जागी आपल्या मर्जीतील अधिकारी बसवा, अशी मागणी कार्यकर्त्याकडून होत आहे.

 

राज्य सरकारने आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS officers) बदल्या केल्या आहेत. त्यात पुण्यातील पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे (Suhas divase) यांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 44 तर तिसऱ्या टप्प्यात वीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यात पुण्यातील अधिकाऱ्यांचा समावेश नसल्याचे दिसून आले . (The search for IAS officers for Pune district is endless) 

 

पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांमध्ये (IAS officers) मोठे फेरबदल करण्याचे ठरले असले, तरी त्यांच्या जागी कोणाला आणायचं हा प्रश्न सुटत नाही. पुण्यात येण्यासाठी अनेक अधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात असलेल्या काही अधिकाऱ्यांनी शिंदे सरकारसोबत जुळवून घेतल्याने काही प्रमाणात त्याला दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.  तर काही अधिकाऱ्यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यामुळे त्यांची बदली अटळ असली तरी त्यांच्या जागी कोणाला आणायचे हा प्रश्न आहे. (The search for IAS officers for Pune district is endless!)

 

जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आपण तुमच्या किती कामाचे आहोत, हे पटवून देण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांच्यावरील बदलीची टांगती तलवार काहीशी टळली. परंतु ज्या अधिकाऱ्यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या ठिकाणी कोणाला बसवायचं यावर मंथन सुरू आहे.  (The search for IAS officers for Pune district is endless!)

 

बदल्या कधी होणार ?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार हे निश्चित मानले जाते. त्यामुळे काही अधिकारी आपली बदली होणार असे मानून आपल्या हातावरील फायली क्लिअर करत आहेत. तर काही अधिकारी चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळावी यासाठी मुंबई वाऱ्या करत असल्याची चर्चा सुरू आहे. काहींनी मिळेल त्या ठिकाणी रुजू होण्याचा निश्चय केल्याचीही चर्चा शासकीय कार्यालयांमध्ये सुरु आहे.

 

अधिकाऱ्यांनी केली मनाची तयारी

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून शिक्का बसलेल्या अधिकाऱ्यांची अगोदर बदली होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्या अधिकाऱ्यांनी तशी मनाची तयारीही केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. (The search for IAS officers for Pune district is endless!)

 

Local ad 1