अखेर एमपीएससी परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission MPSC) घेण्यात येणार्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकाची सविस्तर माहिती लोकसेवा आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाचे सह सचिव सुनील अवताडे यांनी दिली. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)
राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य, पोलीस उपनिरीक्षक, राज्यसेवा परीक्षा (Civil Judge Junior Level and Judicial Magistrate First Class Examination, Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Joint Pre-Examination, Maharashtra Group-C Service Main Examination, Maharashtra Gazetted Technical Service Joint Pre-Examination, Maharashtra Forest Service Main Examination, Maharashtra Engineering Service Chief, Sub-Inspector of Police, State Service Examination 2022) याशिवाय इतर परीक्षांचे आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार आहे. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)
शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल. या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)
वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावितमहिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)
अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती (Updates) वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे/येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल.
संबंधित परीक्षेनुसार भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव यांनी कळविले आहे. (Announced the scheduled schedule of MPSC examinations)